समोसा

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#स्ट्रीट

समोसा

#स्ट्रीट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3बटाटे
  2. 1/2 वाटीशेंगदाणे
  3. 2हिरवी मिरची
  4. 1/2 टेबल स्पूनलाल तिखट
  5. 1/2 टी स्पूनगरम मसाला
  6. 1/2 टी स्पूनधने पूड
  7. 1/2 टी स्पूनजीरे पूड
  8. 1/2 टी स्पूनआमचूर पावडर
  9. 1/2 टेबल स्पूनजीरे
  10. 1/2 टेबल स्पूनधने
  11. 1 इंचआले
  12. मीठ
  13. तेल
  14. 1 कपमैदा

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे आणि शेंगदाणे कुकरमध्ये शिजवून घ्या. एका कढईमध्ये तेल तापवून घ्या. त्यात जीरे, धने, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. आता त्यात उकडलेले शेंगदाणे घाला आणि परतून घ्या.

  2. 2

    आता त्यात उकडून कुस्करलेला बटाटा, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरते मीठ, धने पूड आणि जीरे पूड घालून परतून घ्या. आता त्यात आमचूर पावडर आणि कोथिंबीर घाला. आणि छान परतून घ्या. थंड झाल्यावर मध्यम आकाराचे गोळे करा.

  3. 3

    आता पारीचे पीठ तयार करण्यासाठी, एका खोलगट भांड्यात मैदा घ्या. त्यात चवीपुरते मीठ, जीरे आणि एक टेबल स्पून तेल गरम करून घाला.

  4. 4

    चमच्याने ढवळून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळून घ्या. नंतर मध्यम आकाराचे गोळे करून, पारी लाटून घ्या.

  5. 5

    मधोमध कापून घ्या. आता त्याचे कोन बनवा. कोन मध्ये तयार केलेल्या सारणाचा गोळा ठेवून, समोसे बनवा.

  6. 6

    कढई मध्ये तेल गरम करून घ्या. त्यात सर्व समोसे मंद आचेवर तळून घ्या. गरमागरम समोसे खाण्यासाठी तयार! टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
रोजी

टिप्पण्या (2)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
मी आज बनविले समोसे, खूपच छान झाले

Similar Recipes