चना मसाला (चन्याची उसळ)

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#फोटोग्राफी
संपुर्ण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या कडधान्याची उसळ करतच असतात. मी चन्याची उसळ बनवली.हिरवे वाटण ,काळे/लाल वाटण वापरुन चन्यांना त्यातच शिजवले म्हणजे मसाला चन्याच्या आत चांगलाच मुरतो.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. लाल वाटण
  2. 1 वाटीकीसलेले सुके खोबरे
  3. 1 वाटीपातळ चिरलेला कांदा
  4. 1 टीस्पून धनेपूड
  5. 1/2 टीस्पून जीरेपूड
  6. 1Tbs तेल
  7. हिरवे वाटण
  8. मुठभर कोथिंबीर
  9. 10-15सोललेले लसूण
  10. 1 इंचअदरक
  11. 1-2हिरवी मिरची
  12. फोडणीसाठी
  13. 1/2 वाटीटमाटो प्युरी
  14. 1तमालपत्र
  15. 1 तुकडादालचीनी
  16. 1मसाला वेलची
  17. 1कांदा बारीक चिरलेला
  18. 1 टीस्पून शहाजीरे
  19. मसाल्यासाठी
  20. 2-3मीरे व लवंग
  21. 1Tbs कांदा लसूण मसाला
  22. 1 टीस्पून तिखट
  23. 1/2tsp हळद
  24. चवीनुसारमीठ
  25. 1 कपरात्रभर भिजवलेले चणे

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    लाल वाटणासाठीचा कांदा,खोबरे थोड्या तेलात परतून मिक्सरला वाटा.खडे मसाले फोडणीसाठी ठेवणे.

  2. 2

    हिरव्या वाटणाचे साहित्य एकत्रच वाटणे.

  3. 3

    दोन चमचे तेल तापले की पहिले खडे मसाले टाकून परतणे.नंतर चिरलेला कांदा टाकून परतणे.

  4. 4

    टमाट्याची प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतणे.हिरवे वाटण मिसळणे व परतणे.

  5. 5

    लाल वाटण एक चमचा, कांदालसून मसाला,तिखट,हळद टाकून परतणे.

  6. 6

    गरम पाणी टाकून उकळणे व भिजवलेले चणे टाकून 15 मिनिटे शिजवणे. हे सर्व कुकरमध्येसुद्धा करु शकता.चने शिजल्यानंतर लच्छा पराठा किंवा साध्या पोळीसोबत खाण्यात मग्न होवून जा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes