झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात.

झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)

सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 ते 5 जांभळी वांगी
  2. 1 कपसुकट(साफ केलेली)
  3. 2बारीक चिरलेले कांदे
  4. 1 टेबलस्पूनमिक्स मसाला
  5. 1 टेबलस्पूनतिखट
  6. 1 टेबलस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  8. चवीनुसारमीठ
  9. चवीनुसारथोडासा चिंच कोळ(आमसूल किंवा कोकम पण चालत)
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    गॅस वर तेल गरम करत ठेवा.

  2. 2

    गरम तेलात कांदा छान परतवून घ्या.त्यावर आले लसणाची पेस्ट टाका.

  3. 3

    हळद, लाल तिखट, मीठ टाकून 2 मिनिट छान परतवून घ्या.

  4. 4

    त्यामध्ये पाण्यात भिजवलेली सुकट मिक्स करा.सुकट तेलात परतवल्याने उग्र वास निघून जातो.

  5. 5

    आता सुकट मध्ये चिंचेचा कोळ व चिरलेली वांगी मिक्स करा.

  6. 6

    मिडीयम गॅस वर ही भाजी वाफेवर शिजवा. मध्ये मध्ये भाजीला चमचा फिरवत राहा.भाजीत पाण्याचे प्रमाण कमी वापरायचे आहे. 20 मिनिटात भाजी छान शिजली जाते.उतरवताना मिक्स मसाला व कोथिंबीर टाकून 2 मिनिट भाजी झाकून ठेवा.

  7. 7

    ही भाजी तांदळाच्या भाकरी सोबत अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes