मुंबई स्पेशल वडा पाव

Saili Gosavi
Saili Gosavi @cook_22947515

मुंबई किंवा भारतातील अशी व्यक्ती नसेल की ज्याला वडापाव माहित नाही. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या दिलाची धडकन म्हणजेच वडापाव. त्यातून मुंबई चे हे स्पेशल खाद्य. अगदी दहा रुपयांपासून मिळणारा. गलोगल्ली मिळणारा. सगळ्यांची भूक भागवणारा वडापाव.
चला तर मग आज मी तुम्हाला असाच एक मुंबईच्या स्पेशल वडापाव खाऊ घालणार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रॅमबटाटे
  2. 200 मिली तेल
  3. 100 ग्रॅमबेसन
  4. 2 टी स्पूनमिरची पेस्ट
  5. 1 टीस्पूनआले पेस्ट
  6. 1 टी स्पूनलसूण पेस्ट
  7. 1 टिस्पून मीठ
  8. 1/4 टिस्पून हळद

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडून स्मॅश करून घेतले, त्यामध्ये आलं लसून मिरची पेस्ट एकत्र करून छान पैकी फोडणी दिली व मीठ हळद टाकून चांगले मिक्स करून घेतले.

  2. 2

    वरील सर्व मिश्रण एकत्र करून चांगले मळले व त्याचे गोळे तयार केले.

  3. 3

    बेसन पीठ एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये मीठ, चिमूटभर सोडा, हळद,मिरची पावडर टाकून एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करून घेतले.

  4. 4

    कढईत तेल गरम करायला ठेवले व त्यानंतर तयार केलेले गोळे बेसनाच्या पीठात घोळवुन मंद आचेवर तळून वडे तयार.

  5. 5

    बटाटावडा हा खोबर्‍याच्या चटणी शिवाय अपूर्ण आहे त्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार केली. चटणी मध्ये सुके खोबरे,लसून,मिरची आणि मीठ एकत्र करून वाटले आणि चटणी तयार केली.

  6. 6

    लोक डाऊन असल्यामुळे पाव मिळाले नाहीत त्यामुळे घरीच पाव तयार करण्याचा प्रयत्न केला.

  7. 7

    अशा तऱ्हेने तयार झालेले वडे, पाव, चटणी तयार झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Saili Gosavi
Saili Gosavi @cook_22947515
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes