बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

#आई .....अहो आईसाठी आता नाहीत त्या आमच्यात.अहो आई खूप सुगरण . मला जे येतात पदार्थ ते सर्व पदार्थ जवळपास हाताखालीच शिकले. हाॅटेलमधे गेल्यावरची त्यांची ऑर्डर ठरलेली .... बटर चिकन विथ रोटी ...स्वारी खुश मग

बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)

#आई .....अहो आईसाठी आता नाहीत त्या आमच्यात.अहो आई खूप सुगरण . मला जे येतात पदार्थ ते सर्व पदार्थ जवळपास हाताखालीच शिकले. हाॅटेलमधे गेल्यावरची त्यांची ऑर्डर ठरलेली .... बटर चिकन विथ रोटी ...स्वारी खुश मग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोबोनलेस चिकन
  2. 2 कपकांदे बारीक चिरून
  3. 1 कपटोमॅटो बारीक चिरून
  4. १०-१२ लसूण पाकळ्या
  5. 1 इंचआल्याचा तुकडा
  6. 10काजूची पूड
  7. कोथिंबीर
  8. 3 टेबल स्पूनबटर
  9. 1/2 कपदही
  10. 1 (1/2 टेबल स्पून)काश्मिरी मिरची पावडर
  11. 1 टेबल स्पूनधणे-जिरे पावडर
  12. 3 टेबल स्पूनलाल तिखट
  13. 1 टी स्पूनहळद
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    काजू पावडर आणि कोथिंबीरीचे वाटण करून घ्या.चिकनच्या तुकड्यांना दही,काश्मिरी मिरची पावडर,धने जिरे पावडर आणि मीठ घालून मॅरीनेशन करून अर्धा तास बाजूला ठेवावे अर्ध्या तासानंतर पॅनमध्ये तेल न घालता चिकन पूर्ण परतवून घेणे.

  2. 2

    कढईमध्ये तेल आणि बटर तापवून त्यामध्ये कांदा परतून घेणे कांदा पारदर्शक झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घेणे. आता त्यामध्ये हळद आणि लाल तिखट, काजू कोथिंबिरीची पेस्ट घालून मस्त मसाला परतून घेणे.

  3. 3

    त्या तयार मसाल्यात एक पेलाभर पाणी घालून फक्त पीठ ग्रेव्ही तयार करून घेऊन आपण शिजवलेले चिकन त्यामध्ये घालायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून गॅस दहा मिनिटांनी बंद करायचा. सव्र्ह बटर चिकन विथ गार्लिक नान

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes