बटाटा पोहा (pohe recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

लहानपणापासून पोहे हा प्रकार खूप आवडतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते. इथे आज मी बटाटा घालून बटाटे पोहे केले. बघूया या बटाटा पोह्यांची रेसिपी.

बटाटा पोहा (pohe recipe in marathi)

लहानपणापासून पोहे हा प्रकार खूप आवडतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते. इथे आज मी बटाटा घालून बटाटे पोहे केले. बघूया या बटाटा पोह्यांची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमजाड पोहे
  2. 80 ग्रॅमउकडलेले बटाटे
  3. 50 ग्रॅमबारीक चिरलेला टोमॅटो
  4. 40 मिली तेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 4 टीस्पूनशेंगदाणे
  9. 3/4हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  10. 1 टीस्पूनकिसलेला आल
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पोहे चाळून आणि स्वच्छ धुऊन घ्यावेत. आता बटाटा बारीक चिरून घ्यावा टोमॅटो बारीक चिरून घ्यावे मिरच्यांचे तुकडे करून घ्यावे आल बारीक किसून घ्यावे.

  2. 2

    कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पानं आल्याचे किस, शेंगदाणे घालून छान परतून घ्यावे. मिरच्या आणि शेंगदाणे थोडे क्रिस्पी होत आले की त्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो घालून पुन्हा परतावे.

  3. 3

    झाल्यावर पोहे त्यात घालून एकसारखे एकजीव करून हलवून घ्यावे. त्यास झाकून थोडी वाफ आणावी आणि नंतर पुन्हा त्यात मीठ घालून वाफ आणावी. दहा मिनिटात आपले बटाट्या पोहे तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes