चटपटीत समोसे (samosa recipe in marathi)

Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070

चटपटीत समोसे (samosa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5 बटाटे उकडून
  2. 1 टेबल स्पूनआलं-लसूण मिरचीची पेस्ट
  3. 1/2 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  4. 1/2 टी स्पूनचाट मसाला
  5. एका लिंबाचा रस
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. आवरणासाठी साहित्य
  9. 2 कपमैदा
  10. 1 टी स्पूनओवा
  11. 1/4 कपतुपाचे मोहन
  12. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    एका पातेल्यात मैदा,ओवा,मीठ आणि पातळ केलेले तूप (वनस्पती तूप) घालून एकजीव करा. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या आणि ओल्या फडक्‍यात अर्धा तास झाकून ठेवा

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून 1 मिनिट परतून घ्या कुस्करलेले बटाटे मीठ लाल तिखट लिंबू रस आणि चाट मसाला घालून एकत्र करा व सारण एका ताटलीत काढून थंड करून घ्या

  3. 3

    आता ओल्या फडक्‍यात घातलेले पीठ घेऊन ते पाच मिनिटे मळून घ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या.पिठाचा गोळा पातळ गोलाकार लाटून घ्या आणि सुरीने त्याचे दोन अर्धवर्तुळात तुकडे करा एक तुकडा घेऊन त्याच्या सरळ भागाच्या कडांना पाणी लावा आणि तो बंद करा. आता झालेल्या शंकूचा आकार तयार त्या आकारात सारण भरा आणि राहिलेल्या भाग हाताने दाबून नीट चिकटवा.अशाप्रकारे सर्व समोसे भरून ओल्या रुमालाने झाकुन ठेवा.

  4. 4

    आता तेल तापलेल्या कढईत एकेक करून समोसे घालून मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या गरमा गरम चटपटीत समोसे सॉसबरोबर खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vrushali Patil Gawand
Vrushali Patil Gawand @cook_19754070
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes