तुरीची आमटी (toorichi amti recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#cookameal इथे मी तुरीची आमटी बनवली आहे. ह्या माझ्या स्टाईल ची आमटी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करते.
आजआमच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मिल बनविला. त्यात ही तुरीची डाळ बनवली.
सर्वांचे घर स्वच्छ राहण्यासाठी रोज न चुकता नेमाने सगळ्या बिल्डिंगमध्ये येऊन क्लिनींग करतात. अजिबात न घाबरता न डगमगता नेटाने काम करतात खास त्यांना हॅट्स ऑफ करून त्यांच्यासाठी हा स्पेशल बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतूरडाळ
  2. 3 टीस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  8. 1 टीस्पूनचिंच
  9. 2 टीस्पूनगूळ
  10. 8कडीपत्ता पाने
  11. चवीनुसारमीठ
  12. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी त्यात पाणी घालून कुकर मधून शिजवुन घ्यावी.

  2. 2

    कढईत तेल गरम करून घ्या. त्यामध्ये मोहोरी हिंग हळद तिखट गोडा मसाला कढीपत्त्याची पानं घालून घ्यावी. आता त्यामध्ये तुरीची डाळ पाणी घालून चिंच घालून घ्यावे. हे सर्व एकसारखे करून घ्यावे.

  3. 3

    आता आमटीला थोडी उकळी आली की त्यामध्ये गूळ आणि मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे. मग गुळ विरघळला की गॅस बंद करावा व एका भांड्यामध्ये ही आमटी काढून घ्यावी. आपली आंबट गोड यम्मी टेस्टी आमटी तयार आहे. अशी आमटी खानदेश मध्ये पोळी कुस्करून खाण्यासाठी बनवतात. आमटी पोळी हा तिथला अगदी जवळचा पदार्थ आहे रोजच्या जेवणात असतोच असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes