शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे.

शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)

#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनीटे
  1. १४-१५ सुक्या मिरच्या...तिखट साध्या दोन्ही मिक्स
  2. 7-8लसूण पाकळ्या
  3. 1/2 इंचआलं
  4. 1 टीस्पूनकोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून
  5. 1 टीस्पूनमीठ...आवडीनुसार कमी जास्त
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनव्हिनेगर
  8. 1/4 टीस्पूनसोया सॉस
  9. 1/4 टीस्पूनदालचिनी पावडर...आवडत असल्यास
  10. 1 टीस्पूनटोमॅटो सॉस
  11. 1 टीस्पूनकॉर्न फ्लोअर
  12. 2 कपपाणी..मिरच्या उकळण्यासाठी
  13. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१५-२० मिनीटे
  1. 1

    मिरच्यांचे दांडे आणि आतल्या बिया काढून,मिरच्या पाण्यात घालून छान उकळवून घेतल्या.

  2. 2

    गार झाल्यावर पाणी काढून टाकले व मिरच्या,लसूण पाकळ्या,आलं,कोथिंबिरीच्या काड्या मिक्सर मधून छान पेस्ट होईल इतपत बारीक वाटून घेतल्या. बाकीचेही साहित्य तयार ठेवले.

  3. 3

    कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात मीठ, साखर, टोमॅटो सॉस, सोया सॉस, दालचिनी पूड घालून नीट शिजू दिले.

  5. 5

    कॉर्न फ्लोअर ची पेस्ट करून ती त्यात घालून ढवळून छान शिजवून घेतले. कॉर्न फ्लोअर मुळे सॉस ला कन्सिस्टनसी छान येते. सॉस गार झाल्यावर त्यात व्हिनेगर घालून नीट मिक्स केले.

  6. 6

    तयार सॉस बाउल मध्ये काढून घेतला.नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवला. चायनीज पदार्थ बनवताना त्यात वापरणार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes