मेथी मलई मटर (meethi mutter malai recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

हॉटेल स्टाईल. नेहमीच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो त्याच पद्धतीने बनवलेल्या की घरातल्या ना जेवणात मजा येत नाही. त्याच भाज्या घेऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे हॉटेल स्टाईलमध्ये काही हवं असेल तर मग ते कसे करावे, तर मग आता घरात जे साहित्य आहे त्यापासूनच मी हॉटेल स्टाइल ग्रेव्ही मध्ये मेथी आणि वटाणा हे दोन घटक वापरुन ही भाजी केली आहे.

मेथी मलई मटर (meethi mutter malai recipe in marathi)

हॉटेल स्टाईल. नेहमीच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो त्याच पद्धतीने बनवलेल्या की घरातल्या ना जेवणात मजा येत नाही. त्याच भाज्या घेऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे हॉटेल स्टाईलमध्ये काही हवं असेल तर मग ते कसे करावे, तर मग आता घरात जे साहित्य आहे त्यापासूनच मी हॉटेल स्टाइल ग्रेव्ही मध्ये मेथी आणि वटाणा हे दोन घटक वापरुन ही भाजी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10 ग्रॅमटरबुजाच्या बिया
  2. 50 ग्राममेथी ची भाजी
  3. 50 ग्रॅमहिरवा ओला वाटाणा
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 10 ग्रॅमपांढरी तीळ
  6. 20 ग्रॅमदुधाची पावडर
  7. 1 टी स्पूनकॉर्न फ्लॉवर
  8. 1 टी स्पूनचाट मसाला
  9. 1 टी स्पूनसाखर
  10. 1 टी स्पूनगरम मसाला
  11. 3 ते 4हिरव्या मिरच्या
  12. चवीप्रमाणेमीठ
  13. 1 टेबल स्पूनतेल किंवा घी
  14. 1/2 टेबल स्पूनठेचलेला लसूण
  15. 1तमालपत्
  16. 2लवंगा
  17. 1चक्रीफुल
  18. 1मोठी वेलची
  19. 2हिरव्या छोट्या वेलची
  20. 4काळा मिरी
  21. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    चला तर मग मैत्रिणींनो बनवूया हॉटेल स्टाईल मेथी मलई मटर. मी रेसिपी माझ्याकडे घरात जे घटक होते त्याकडे पासूनच बनवली आहे. सर्वप्रथम मेथीची भाजी स्वच्छ साफ करून पाण्यामधून त्याची पानं स्वच्छ धुवून घ्यावी. कढईमध्ये एक चमचा तेल टाकून मेथी बारीक चिरून त्यामध्ये एक तीन ते चार मिनिटं परतून घ्यावी. वटाणे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी

  2. 2

    कढई मध्ये अजून दोन टेबलस्पून तेल टाकून बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होईस्तोवर परतून घ्यावा नंतर त्यामध्ये पांढरे तीळ, टरबुजाच्या बिया, ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या हे सर्व घटक टाकून दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्यावे. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे त्यामध्ये आता चाट मसाला, कसुरी मेथी, कॉर्न फ्लोअर, साखर, व दुधाची पावडर सर्व जिन्नस अर्धा कप पाणी टाकून वाटून घ्यावे. खूप बारीक नाही आणि खुप जाडसर नाही रवाळ पेस्ट करावी.

  3. 3

    आता कढईमध्ये एक टेबल स्पून घी टाकावे व त्यामध्ये दालचिनी लवंग मिरी मोठी वेलची छोटी वेलची चक्रीफुल तमालपत्र हे सर्व फोडणीस द्यावे त्यावरती वाफवलेले वटाणे आणि परतलेली मेथी टाकून त्यामध्ये चांगले मिक्स करावे. मग त्यामध्ये आपण वाटलेली पेस्ट टाकावी तुम्हाला ग्रेव्ही जितकी हवी असेल त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकून घ्यावे आणि चांगले मिक्स करावे, मग त्यामध्ये एक टी स्पून गरम मसाला ॲड करावा. झाकण ठेवून एक दोन मिनिटं बस द्यावी. ग्रेव्ही ला वरती घी सुटलेले दिसले की ही भाजी झाली असे समजावे.

  4. 4

    मीठ आणि साखरेचे प्रमाण चाखून पहावे. झाली तुमची मस्त मलई मेथी तयार. सर्व्ह करताना तुम्ही वरून क्रीम सुद्धा टाकू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes