सोया झुणका (soya jhunka recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

आज भाजी मिळाली नाही मग घरी उपलब्ध असलेल्या जिन्नसांतुन काहीतरी नवीन करायला घेतलं आणि निकाल तुमच्यासमोर सादर ...
यजमानांनी तर मिटक्या मारत खाल्ला .. आणि गायलेसुद्धा " झुणका खिला रे .."

सोया झुणका (soya jhunka recipe in marathi)

आज भाजी मिळाली नाही मग घरी उपलब्ध असलेल्या जिन्नसांतुन काहीतरी नवीन करायला घेतलं आणि निकाल तुमच्यासमोर सादर ...
यजमानांनी तर मिटक्या मारत खाल्ला .. आणि गायलेसुद्धा " झुणका खिला रे .."

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपसोया किंवा सोया ग्रॅन्युल्स
  2. 2कांदे लांब कापलेले
  3. 1मोठा टोमॅटो लांब कापलेला
  4. 2हिरव्या मिरच्या लांब कापलेल्या
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 1छोटी सिमला मिरची लांब कापलेली
  7. 1 टिस्पून तिखट
  8. 1/2 टी स्पूनहळद
  9. 1 टी स्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनजिरे मोहरी
  12. 1/2 कपतेल
  13. 1 टी स्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

पंधरा मिनिट
  1. 1

    प्रथम सोया चंक्स ची मिक्सर वरुन भरड करून घ्यावी किंवा सोया ग्रॅन्युल्स असल्यास ते सुद्धा वापरू शकतो. ही भरड कोमट पाण्यात मीठ घालून पाच मिनिट भिजू द्यावी.

  2. 2

    आता सर्व साहित्य एकत्र ठेवून कढईमध्ये तेल घेऊन गरम करावयास ठेवावे व जिरे मोहरी ची फोडणी घातल्यावर हिरवी मिरची कांदा परतून घ्यावे. त्यानंतर सिमला मिरची घालावी.शिमला मिरची सुद्धा थोडी परतल्यानंतर कोरडे मसाले म्हणजेच हळद,तिखट,गरम मसाला व मीठ ऍड करून टोमॅटो घालून एकदा परतून झाकण ठेवावे.

  3. 3

    वरील साहित्य पाच मिनिट वाफे वर करून आता त्यामध्ये सोया चंक्स ची भरड पाणी पिळून ह्या मिश्रणात घालून एक-दोन वेळा छान छान परतून दोन मिनिटे झाकण ठेवावे,झुणका छान तयार झालेला आहे.वाढताना त्यावर कोथिंबीर पेरावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes