कोलकाता फिश बिर्याणी (kolkatta fish biryani recipe in marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

#बिर्याणी
#दिपाली पाटील

कोलकाता फिश बिर्याणी (kolkatta fish biryani recipe in marathi)

#बिर्याणी
#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ सर्व्हिंग
  1. ५०० ग्राम कतला फिश
  2. 1लिंबूचा रस
  3. चवीप्रमाणे मीठ
  4. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  5. 1/2 टी स्पूनहळद पावडर
  6. 1 टेबल स्पूनतांदळाचे पीठ
  7. 1 कपतेल
  8. 2 कपबासमती तांदूळ
  9. 5कांदे मिडीयम साईज्
  10. 2 इंचआला
  11. 1 टी स्पूनशाह जिरे
  12. 2तमालपत्र
  13. 4हिरवी विलायची
  14. 8काळी मिरी
  15. 4लवंग
  16. 4 इंचदालचिनी
  17. 5 कपपाणी
  18. 2हिरवी मिरची
  19. 1 टी स्पूनधना पुड
  20. 1 टी स्पूनगरम मसाला
  21. 4 टेबल स्पूनदही
  22. 1 टी स्पूनगरम मसाला
  23. 2 टेबल स्पूनसाजूक तूप
  24. 1/2 कपकोथिंबीर बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्वात आधी आपण फिश ला मॅरिनेट करूया.. फिश ला बंगाली स्टाईल मध्ये कट केलेली आहे.. फिश ला स्वच्छ धुऊन घेऊ..त्यावर मीठ आणि लिंबाचा रस लावून ठेवू.. वरतून अर्धा टीस्पून हळद, १ टी स्पून लाल तिखट, तांदळाची पीठ लावून अर्धा तास साठी मॅरीनेशन ला ठेवू..

  2. 2

    पॅन मध्ये तेल गरम करून.. फिश ला दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर पर्यंत फ्राय करून घेऊ...

  3. 3

    दोन कांद्याचे लांब काप करून छान लाल करून घेऊ कांदा आपल्याला बिर्याणी वर टाकायला कामा येणार. बिर्याणी साठी भाताला बनवूया.. तेल गरम करून.. शाह जिरे,तमालपत्र,काळी मिरी,लवंग, दालचिनी, हिरवी विलायची लाल करून घेऊ.. त्यावर एक कांदा लांब चिरलेला टाकूया..

  4. 4

    तांदळाला अर्धा तासासाठी पाण्यात भिजत घालून ठेवू..कांदा लाल झाल्यानंतर तांदूळ आतलं पाणी काढून तांदूळ टाकून दोन मिनिटांसाठी छान परतून घेऊ..चार कप गरम पानी तांदळावर टाकून उकळी आल्यानंतर.. अर्धा टीस्पून आलं किसलेला टाकून छान एकत्र करून... मीठ टाकून दहा मिनिटांसाठी केप लावून शिजवून घेऊ.. दहा मिनिटानंतर आपला बिर्याणी साठी भात रेडी आहे.. आपण भाताला ९५,% शिजून घेतला आहे..

  5. 5

    कढईत तेल गरम करू.. त्यात एक कांदा लांब चिरलेला परतून घेऊ... १ कांदा १ इंच आलं २ हिरवे मिरची चा पेस्ट करून परतलेले कांद्यावर टाकून छान लाल परतून घेऊ... लाल तिखट, धना पुड थोड थोडं पाणी टाकून आठ ते दहा मिनिटे पर्यंत छान लाल होईपर्यंत परतून घेऊन..

  6. 6

    मसाल्यात मीठ टाकून.. दही टाकून छान परतून घेऊ.. आता त्यावर अर्धा टीस्पून गरम मसाला टाकून परतून घेऊ.. अर्धा कप पाणी टाकून छान मसाला उकळी येऊ देऊ..

  7. 7

    मसाले मध्ये फिश फ्राय टाकूया.. त्यावर लाल तळलेला कांदा टाकूया... एक मिनिटानंतर गॅस बंद करून देऊ.. आता आपण बिर्याणी लेयर बनवूया.. पॅन मध्ये आधी भात टाकूया..

  8. 8

    भाता वरती फ्रिश फ्राय ग्रेव्ही.. आणि गरम मसाला टाकून..त्यावर परत भारताची लेयर.. साजूक तूप.. लाल केलेला कांदा.. कोथंबीर टाकून झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनिटासाठी होऊ देऊ..

  9. 9

    पाच मिनिटानंतर आपली छान बंगाली स्टाईल मध्ये कोलकत्ता फिश बिर्याणी रेडी आहे.. छान छान बिर्याणीचा आस्वाद घ्या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes