क्रिस्पी फ्रॉईड चिकन (crispy fried chicken recipe in marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

#दिपाली पाटील

क्रिस्पी फ्रॉईड चिकन (crispy fried chicken recipe in marathi)

#दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ सर्व्हिंग
  1. ७५० ग्राम चिकन
  2. 1 टेबल स्पूनलाल तिखट
  3. 1/2 टी स्पूनहळद
  4. 1 टी स्पूनगरम मसाला
  5. 10लसणीच्या पाकळ्या पेस्ट
  6. 1 इंचआलं पेस्ट
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. 4 टेबल स्पूनदही
  9. 1 कपमैदा
  10. 1/2 कपकॉर्न फ्लोअर
  11. 10काळी मिरी ची पावडर
  12. तेल फ्राय करणे साठी
  13. 3एग्ज

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करूया.. चिकनला स्वच्छ धुऊन घ्या.. लाल तिखट, हळद,मीठ,गरम मसाला, आला लहसून पेस्ट टाकून छान एकत्र करूया..

  2. 2

    सर्व मसाले एकत्र केल्यानंतर... 2 टेबल स्पून तेल टाकून छान मिक्स करू.. आता दही टाकुन एकत्र करूया.. चार तासांसाठी फ्रिजमध्ये मॅरीनेशन होऊ देऊ..

  3. 3

    आता आपण कोटिंग तयार करूया..कॉर्नफ्लोअर, मैदा,मीठ,काळीमिरी पावडर, चाळणी नी दोन वेळा गाळून घेऊन.. जेणेकरून आपलं कोटिंग पेस्ट छान एकत्र होऊन जाणार... एक बाऊल मध्ये अंडे ला फेटुन घेऊ... आपला कोटिंग तयार झालेला आहे..

  4. 4

    मॅरिनेट चिकनला कोटिंग करूया.. सर्वात आधी मैदा आणि कॉर्नफ्लोअर बनवलेला आहे त्याच्यात कोटींग करू या नंतर एग मध्ये डीप करूया.. पुन्हा मैदे मध्ये कोटिंग करूया.. आणि चाळणी मध्ये ठेवून हलवून घेऊ जेणे करुन एक्स्ट्रा कोटिंग खाली पडणार..

  5. 5

    एका कढईमध्ये तेल गरम करून.. चिकनला फ्राय करूया.. मध्यम आचेवर आठ मिनिटापर्यंत छान फ्राय होऊ देऊ.. त्याला आता पलटून घेऊन.. परत आठ मिनिटे पर्यंत फ्राय होऊ देऊ..

  6. 6

    आपल्या छान चिकन गोल्डन ब्राऊन कलरचा फ्राय झालेला आहे.. टोमॅटो केचप सोबत क्रिस्पी फ्राईड चिकन ्चा आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes