कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)

Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901

#myfirstrecipe  पाऊस आणि गरमागरम भजी हे ठरलेलं समीकरण.. बाहेर रिमझिम पाऊस पडला की आवर्जून होणारी रेसिपी म्हणजे कुरकुरीत भजी 😍😋😋.. आणि जवळ जवळ सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे.. तेव्हा भजी झालीच पाहिजे.. आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत कांदा भजी असतील तर सोने पे सुहागा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 5मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
  2. 2हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून
  3. 2 टेबल स्पूनतांदूळाचे पीठ
  4. 1 कपबेसन पीठ
  5. 1/2 टी स्पूनजिरे
  6. 1/2 टी स्पूनओवा
  7. 1/2 टी स्पूनलाल तिखट
  8. 2 टी स्पूनगरम तेल
  9. मूठभरकोथिंबीर
  10. तळण्यासाठी तेल
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदा उभा चिरून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे
    टाकावे आणि मीठ लावून चोळून पंधरा मिनिटे ठेवावे. पंधरा मिनिटानंतर ओवा, जिरे, लाल तिखट, तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यावे. गरम तेल आणि कोथिंबीर घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता गरम तेलात कांदा भजी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी फस्त करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrushali Bagul
Vrushali Bagul @cook_21034901
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes