नारळाची वडी (naralachi wadi recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#रेसिपीबुक #week2
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे
माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे
हे गाणं नकळतच ओठावर आल जेव्हा कूकपॅड ने ह्या वीक ची थीम दिली गावाकडच्या 2 रेसिपी. आम्ही लहानपणी जास्त गावी गेलो नाही कारण बाबा युनिव्हर्सिटी मध्ये कामाला मग त्यांना मे मध्ये छुट्टी नसायची त्यामुळे अगदी 2 किंवा 3 गेले असेन गावी. पण ह्या वेळात खूप साऱ्या आठवणी आहेत माज्या. माझ माहेर देवगड. आणि देवगड म्हणजे हापूस आंबा, किल्ले, पवनचक्की, कुणकेश्वराचे मंदिर, घराला लागून समुद्र, नारळाची झाडे,मासळी असा माझ गाव आणि त्या गावात राहणारी👩‍👩‍👦‍👦 काका, काकू, भावंड. आम्ही गेलो गावी तर किती खुश असायचे आणि मुंबई ला परत येताना डोळ्यात पाणी 😔भरायचे सांगायचे परत लवकर या गावी घरातुन निघताना आवर्जुन खोबऱ्याची वडी चा डब्बा भरून द्यायचे कारण आम्हाला खूप आवडायचा ना म्हणून. त्याचीच रेसिपी आज मी इथे देत आहे😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपकिसलेला नारळ
  2. 1 कपसाखर
  3. 1/2 कपदुध
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्या

  2. 2

    पॅन मध्ये तूप गरम करा. त्यात खोबरे, दूध, साखर मिक्सर करून घ्या

  3. 3

    मिश्रण सतत हलवत रहा. पण मध्ये पाण्याचे थेंब दिसेनासे झाले कि समजावी वडी तयार झाली आहे

  4. 4

    एक ट्रे ला तुपाचा ब्रशिंग करून घ्या त्या मध्ये वडी थापा. 10 मिनिट ती कट करा. व थंड झाल्यावर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

Similar Recipes