कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#फोटोग्राफी
वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात..
दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते.
दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते..
चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1गाजर किसून
  2. 1बीट उकडून किसून
  3. 1टोमॅटो बारीक चिरुन
  4. 1टेबलस्पून शेंगदाणे कूट
  5. 3टेबलस्पून दही
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 3-4कडिपत्ता पाने
  8. कोथिंबीर
  9. 1टी.स्पून साखर
  10. चवीनुसारसैंधव मीठ
  11. 1टेबलस्पून तेल फोडणीसाठी
  12. फोडणी साहित्य काळी मोहरी,जिरं हिंग, किंचीत हळद

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    प्रथम एका वाडग्यात उकडून किसलेले बीट,किसलेले गाजर, टोमॅटो एकत्र करा‌.

  2. 2

    यामध्ये शेंगदाणे कूट,साखर,मीठ दही घालून मिक्स करावे.

  3. 3

    आता पळीत तेल घाला.तेल गरम झाले की त्यात मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता,मिरच्यांचे तुकडे घालून खमंग चरचरीत फोडणी करून घ्यावी आणि कोशिंबिरीवर ओतावी.व्यवस्थित कालवून घ्या‌.वरुन कोथिंबीर घालून खायला तयार चटकदार कोशिंबीर..

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes