#गुळाच्या खुसखुशीत कापण्या

Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830

महाराष्ट्रात आखाड तळायची प्रथा आहे व सुरूवात होते ती गुळाच्या कापण्यांनी. ह्या महिन्यात वाढणारी कफ प्रव्वृत्ती शमविण्यासाठी,पचणास मदत असे अनेक फायदे पारंपरिक रेसीपीचे.कदाचित यामुळेच पूर्वजांनी ठरवलेल्या प्रथांचे पालन आपण आजही करतो
चला तर रेसीपी पाहूयात

#गुळाच्या खुसखुशीत कापण्या

महाराष्ट्रात आखाड तळायची प्रथा आहे व सुरूवात होते ती गुळाच्या कापण्यांनी. ह्या महिन्यात वाढणारी कफ प्रव्वृत्ती शमविण्यासाठी,पचणास मदत असे अनेक फायदे पारंपरिक रेसीपीचे.कदाचित यामुळेच पूर्वजांनी ठरवलेल्या प्रथांचे पालन आपण आजही करतो
चला तर रेसीपी पाहूयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
३ जण
  1. १वाटी गव्हाचे पीठ, १/२ वाटी गूळ, पाव वाटी पाणी
  2. सुंठ, बडीशेप, वेलची, चिमुटभर मीठ, खसखस २ च. तूप १ टे.स्पून बेस्ट पीठ व तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम पाण्यात गुळ विरघळून घ्या पीठात खसखस सोडून सर्व जिन्नस एकत्र करा

  2. 2

    तुपाचे कडकडीत मोहन करून पिठात ओता पीठ मिक्स करून घ्या

  3. 3

    गुळाचे पाणी घालून पीठ मळून घ्या १० मिनिटे झाकून ठेवावे

  4. 4

    गोळा करून लाटावे वरून खसखस लावून पुन्हा लाटावे या प्रमाने दोन्ही बाजूंना खसखस लावून शंकरपाळे पेक्षा पातळ लाटावे व काप करावेत

  5. 5

    तेल हलकेच गरम झाले की मिडीयम गॅस वर कापण्या तळाव्यात खुसखुशीत कापण्या तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830
रोजी

Similar Recipes