नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#सूप
सूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.
सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.
सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.
सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवा
जेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.
सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहे
सूप हा झटपट होणारा प्रकार आहे.
आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पूननाचणी पीठ
  2. 380 ग्रॅमपाणी
  3. 15 ग्रॅमबारिक चिरलेला गाजर
  4. 10 ग्रॅमस्वीट कॉर्न चे दाणे
  5. 1 टेबलस्पूनआंबट दही
  6. 1/2हिरवी मिरची चीरलेली
  7. 6-7लसूण पाकळ्या बारिक चिरलेली
  8. 1/2 इंचअद्रक बारिक चिरलेला
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनजीरे पुड
  11. 1 टीस्पूनमीठ
  12. 1/2 टीस्पूनमिरी पावडर
  13. 1/2 टीस्पूनसाखर
  14. 1/4 टीस्पूनहिंग
  15. 1 टेबलस्पूनसाजुक तूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व सामग्री तयार ठेवावी आता एका पॅन मध्ये तूप गरम करावे त्यामध्ये बारीक चिरलेला लसुन अद्रक जिरे व हिरवी मिरची घालून परतावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली गाजर व स्वीट कॉर्न चे दाणे घालावे (भाजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता)

  2. 2

    आता परतलेल्या भाज्यांवर झाकण ठेवावे व एक मिनिट वाफ येऊ द्यावी वाफ आली की त्यामध्ये नाचणीचे पीठ घालावं छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे

  3. 3

    आता दही मधे थोडं पाणी घालून त्याचा ताक करून ते परतलेल्या नाचणीच्या पिठामध्ये घाला. वजित का पातळ हवा असल्यास तितके पाणी घालावे (गूठळ्या झाल्या अस्ल्यास त्या विरघळून घ्यावे) आता त्यामध्ये जिरे पूड मीरपूड हिंग मीठ साखर व कोथिंबीर घालून उकळ्ण्यास ठेवावे एक दोन उकळी आली ही गॅस बंद करावा व गरम गरम नाचणीचे सूप सर्व्ह करावे हे सूप इतके पौष्टीक आहे की हे आजारी,वजन कमी करणाऱ्या, वजन वाढवणाऱ्या या व्यक्तींना पण उपयोगी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes