कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)

Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679

#noovenbaking
मास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला .

कॅप्सीकम कॉर्न पिझ्झा (pizza recipe in marathi)

#noovenbaking
मास्टरशेफ नेहा शाह यांनी खूप छान रेसिपी शिकवली. पिझ्झा पण इतक्या सोप्या पद्धतिने करता येऊ शकतो हे कळले. खूप मस्त झाला पिझ्झा चवीला, त्यात गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे health साठी आणखी चांगला .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  3. 1/8 टीस्पूनखाण्याचा सोडा
  4. 1/4काप दही
  5. मीठ
  6. 2 टीस्पूनतेल
  7. 2 टीस्पूनपिझ्झा सॉस
  8. 1लांब चिरलेला कांदा
  9. 2लांब चिरलेली सिमला मिरची
  10. 1 टीस्पूनस्वीटकॉर्न
  11. 1 टीस्पूनमिक्स हेर्ब्स
  12. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
  13. 1/2 कपचीज

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा मिक्स करून दह्यात मळून घेणे, आणि 10 मिनिटे ओल्या रुमालाने झाकून ठेवणे. नंतर त्याचे 2 भाग करून घेणे. आणि पोळीप्रमाणे लाटून घ्या आणि त्याला फोर्क ने टोचे मारून घ्या.

  2. 2

    एक कढई घेऊन त्यात मीठ पसरवा, त्यावर एक स्टॅन्ड ठेऊन त्यावर एक प्लेट ठेवा आणि 10 मिनिट प्रिहिट करून घ्या. तयार पोळी प्लेटवर ठेवा, वरून संपूर्ण कढईवर झाकण ठेवा. 10-12 मिनिटात आपला पिझ्झा बेस तयार होईल.

  3. 3

    लांब चिरलेले सिमला मिरची आणि कांदा, कॉर्न एकत्र करा त्यात मीठ, ओरेगानो, बेसिल, चिली फ्लेक्स टाकून मिक्स करा

  4. 4

    तयार बेस वर बटर लावून घ्या, आता पिझ्झा सॉस लावून घ्या. नंतर हवे असल्यास टोमॅटो केचप लावा आणि भाज्यांचे मिश्रण पसरून घ्या, वरून किसलेले चीज घाला

  5. 5

    आता तव्यावर बटर टाकून त्यावर पिझ्झा चीज वितळेपर्यंत भाजून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manali Jambhulkar
Manali Jambhulkar @cook_24745679
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes