नो ओव्हन नो यीस्ट सिनॉमिन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#noovenbaking
नवीन काही तरी शिकत राहावे. मास्टर शेफ नेहा ह्यांनी करुन दाखवलेली नो ओव्हन बेकिंग ची दुसरी रेसिपी सिनॉमिन रोल्स आज केली..ह्या मधे मी दालचीनी सोबत जाणारे फ्लेवर्स ऐड केलेत. करण आमच्या कडे दालचीनी जास्त कुणाला आवडत नाही.

नो ओव्हन नो यीस्ट सिनॉमिन रोल्स (no yeast cinnamon role recipe in marathi)

#noovenbaking
नवीन काही तरी शिकत राहावे. मास्टर शेफ नेहा ह्यांनी करुन दाखवलेली नो ओव्हन बेकिंग ची दुसरी रेसिपी सिनॉमिन रोल्स आज केली..ह्या मधे मी दालचीनी सोबत जाणारे फ्लेवर्स ऐड केलेत. करण आमच्या कडे दालचीनी जास्त कुणाला आवडत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास -20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1+ 2 कपटेबलस्पून मैदा
  2. 3/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  3. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनसाखर
  6. 1/4+ 1 टेबलस्पून कप दुध
  7. 1 टीस्पूनव्हिनेगर
  8. 2-1/2 टेबलस्पूनवितळलेल बटर
  9. सिनॉमिन फिल्लींग साठी
  10. 2 टेबलस्पूनसाखर
  11. 2 टेबलस्पूनबटर
  12. 1 टीस्पूनसिनॉमिन पावडर
  13. 1/2 टीस्पूनकॉफी पावडर
  14. 2 थेंबवनिला ईसेंसे

कुकिंग सूचना

1 तास -20 मिनिट
  1. 1

    प्रथम दुधा मधे व्हेनिगर घालुन दहा मिनिट बाजुला ठेऊन द्या अत्ता एका परातीत मैद्या घ्या त्या मधे बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,साखर,मीठ घालुन घ्या. दहा मिनिटानी मैद्या मधे व्हेनिगर घातलेले दुध व वितळलेले बटर घालुन छान मळुन घ्या व हा मळलेला गोळा दहा मिनिटा साठी झाकुन बाजुला ठेवा.

  2. 2

    आत्ता तो पर्यंत आपण सिनामिन च फिलींग तैय्यार करु त्या साठी साखर, बटर, सिनामिन पावडर, कॉफ़ी पावडर,आणी वेनिला ईसेंस घालुन फेटून घ्या व बाजुला ठेवा. आत्ता एका खोलगट पॅन मधे मिठ घाला व स्टैंड ठेऊन झाकुन दहा ते बारा मिनिटे स्लो गैस वर गरम करत ठेवा.

  3. 3

    आत्ता दहा मिनिट झाले की मैद्याचा गोळा घेउन दोन तीन मिनिट छान मळा व त्याचा एकच गोळा करून आयाताकृती आकार देऊन (जाडी जवळ पास एक सेंटीमीटर ठेवावी) व त्या वर सिनामिन फिलींग एकसारखी पसरावी. व फोटो मधे दाखविल्या प्रमाणे फ़ोल्ड करा व त्यावर दुसरी बाजू पण फ़ोल्ड करा

  4. 4

    अशी बूक फ़ोल्ड केली की त्यावर लाटण्याने हलकेच दाब देत फिरवा जेणे करुन ते लयेर्स चिपक्तील त्यातील हवा निघुन जाईल. आत्ता त्याचे सम भाग करा अंदाजे सहा भाग होतिल.

  5. 5

    आत्ता त्या सम भागा पैकी एक भाग घेउन पहिल्या फोटो मधे दाखविल्या मधून काप द्यावा व पिळ देतो तसा पिळ देत खाली आणा व दोन्ही टोक खालून एकमेकांना चिप्कून द्या तसेच दुसरा भाग घेउन वेणी सारखे गुंफून घेउन शेवटची टोके खालच्या बाजुनी चिप्कून घ्या असे सगळेच रोल करुन घ्या. तसे हे मफ्फ़ीन मोल्ड मधे करतात पण सध्या उपलब्ध नसल्याने मी वाटिला बटर लावु त्यात ठेवले व ते एका प्लेट वर एल्युमीनियम फोइल ठेऊन त्यावर त्या वाट्या ठेवल्या व ते गरम केलेल्या पॅन मधे स्टैंड वर ठेवा.

  6. 6

    मीडियम गैस वर पंधरा ते वीस मिनट ठेवा व वाटत असल्या की बेक नाही झाले वरुन पाहिजे तसा रंग नाही आला तर पुन्हा सात ते दहा मिनिट ठेवा. इथे मी डेकोरेशन साठी काडीपात्ता ची फांदी व छोटे शो ची दगड़े ठेवली व वरुन त्यावर चाळणी ने पिठी साखर भुरभुर्ली सोबत वनिला पोड, सिनामिन स्टिक आणी कॉफ़ी बीन्स पण ठेवलीत अश्या छानश्या डेकोरेशन नी सिनामिन रोल्स सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes