महाराष्ट्रीयन स्टाईल फ्युजन चिजी भाकरीझा (bhakri pizza recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#फ्युजनरेसिपीज
#week9 post no2
#रेसिपीबुक
#तिरंगा
पिझ्झा हा एक इटालियन पदार्थ आहे.यात मैद्याच्या गोल पोळी/चपातीवर चीज आणि अनेक प्रकारच्या भाज्यांचे/मांसाचे तुकडे घालून तो ओव्हन मध्ये बेक केला जातो आणि त्यानंतर खाल्ला जातो.पिझ्झा हा इटालियन शब्द असून इटालियन भाषेत 'झ' चा उच्चार 'त्झ' किंवा 'ट्झ' असा होत असल्याने पिझ्झा या शब्दाचा अचूक उच्चार 'पित्झा' किंवा 'पिट्झा'असा आहे.
इतिहास :पिझ्झाचा पहिला उल्लेख दक्षिण इटलीच्या गाएता शहरात दहाव्या शतकात सुमारे ९९७ सालच्या आसपास आढळतो.तर आधुनिक पिझ्झाचा वापर सर्वप्रथम इटलीच्या नेपल्स शहरात केला गेला. या मूळच्या पिझ्झात कालांतराने अनेक बदल होत गेले.मैद्याची पोळीच्या जाडी नुसार ठरलेले प्रकार, वर घातल्या जाणाऱ्या भाज्या/चीज/मांसाहारी पदार्थांचे प्रकार यावरून पिझ्झा या पदार्थाची विविध स्वरूपात विभागणी केली जाते. पिझ्झात वापरल्या जाणाऱ्या मैद्याच्या पोळी/चपातीला पिझ्झा बेस असे म्हणतात आणि भाज्या/मांसाचे तुकडे यांना टॉपिंग्ज असे म्हटले जाते.
पिझ्झा हा इटालियन पदार्थ असला तरी कालांतराने जगभर आणि विशेषतः अमेरिकेत तो अधिकाधिक लोकप्रिय होत गेला.पिझ्झाचा बेस,त्यावर वापरण्यात येणारी टॉपिंग्ज आणि पिझ्झा बनवण्याच्या पद्धती यामध्ये जगभरातल्या अनेक देश आणि शहरांमध्ये विविधता आढळून येते आणि या विविधतेवर आधारित असणारे पिझ्झाचे वेगवेगळे प्रकार आढळतात.हे प्रकार अर्थात त्या शहरातल्या लोकांच्या पिझ्झाच्या आवडीनिवडींवरून आणि खाण्याच्या पद्धतीवरून पडलेले आहेत.तर असा हा सर्वांना आवडणारा पिझ्झा आपण आपल्या खाद्यसंस्कृती नुसार बनवावा मग आपली खाद्यसंस्कृती जगात एक नंबर भाकरी आणि ठेचा तर शान आहे आपली याच भाकरी चा आज मी फ्युजन भाकरीझा किंवा भाकरी पिझ्झा केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 100 ग्रॅमबाजरी चे पीठ
  2. आवश्यकतेनुसार पाणी
  3. टाॅपिंग साठी साहित्य
  4. 2 टेबलस्पुनपिझ्झा साॅस
  5. 1कांदा बारीक चिरून
  6. 1शिमला मिरची उभी चिरून
  7. 1गाजर किसुन
  8. कांदा पात बारीक चिरून
  9. 1 टीस्पूनपिझ्झा मिक्स
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 2 टेबलस्पुनपनीर क्रश

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम बाजरी च्या पिठाचा गोळा बनवुन घ्या भाकरी ला बनवतो तसा आपण भाकरी ला पोपडा आणतो पिझ्झा बेस ला पोपडाआणायचा नाही.

  2. 2

    आता भाकरी छान जाडसर थापुन /लाटुन घ्या आणि तवा गरम झाला कि त्यावर भाकरी टाकुन पाणी लाऊन छान भाजुन घ्या.

  3. 3

    आता भाकरी छान भाजली की त्यावर घरातल साजुक तुप लावुन घ्या.आपली मस्त भाकरी पिझ्झा बेस तयार आहे.

  4. 4

    आता टाॅपिंग ची तयारी करून घ्या सर्व साहित्य चिरून घ्या.

  5. 5

    आता गॅस वर पॅन ठेवुन त्यात 1 टीस्पून तेल घालून भाज्या 1 मिनिटे परतुन घ्या. म्हणजे भाज्या मऊ होतील.

  6. 6

    आता सर्व तयारी झाली आहे आता टाॅपिंग करून घ्या. आवडीनुसार भाज्यांचे लेअर करून घ्या.साॅस लावा

  7. 7

    आता पिझ्झा परफेक्ट तयार आहे त्यावर पिझ्झा सिजनिंग घाला.लाल तिखट भुरभुरून घ्या.

  8. 8

    आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे त्यावर भरपूर चीज किसुन घ्या.आणि तवा गरम झाला कि त्यावर बेक करून घ्या.

  9. 9

    मस्त 2 ते 3 मिनिटांनी आपला गरमागरम फ्युजन चिजी भाकरीझा किंवा चिजी भाकरी पिझ्झा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

Similar Recipes