बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे.
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊ. त्यासाठी आपण एका बाउल मध्ये मैदा, मीठ,बेसन पीठ,ओवा, हळद पावडर,घालून मिक्स करून घेऊ. नंतर त्यात गरम तेलाचे मोहन घालून छान पैकी एकत्र करून घेऊ. नंतर थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ. मळलेले पिठ आपण दहा पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवु.
- 2
आता मसाला बनवण्यासाठी, आपण सगळे मसाले एकेक करून धने, जिरे,तीळ, बडीसोप आणि किसलेले खोबरे सुके भाजून घेऊ.आणि थंड होण्यासाठी ठेवू.
- 3
सगळे मसाले मिक्सर च्या पॉटमध्ये घालूया. नंतर त्यात गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ,आणि साखर घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ. तयार आहे आपला बाकरवडी मसाला.
- 4
आता आपण पिठाचा गोळा घेऊन पोळी सारखे लाटून घेऊ. नंतर त्यावर गुळ चिंचेची चटणी पसरवून घेऊ. आता त्यावर आपण बनवलेला बाकरवडी चा मसाला लावून घेऊ. नंतर त्यावर बारीक शेव बसवून घेऊ आणि लाटण्याने लाटून घेऊ.
- 5
आता आपण त्याच्या कडेला पाणी लावून नंतर हाताने थोडेसे दाबून घेऊन त्याचा रोल बनवून घेऊ नंतर त्या रोलचे दोन सेंटीमीटर प्रमाणे कापून घेऊ.
- 6
आता कापलेल्या भाखरवडी ला हलक्या हाताने दाबून करून घेऊ. म्हणजे त्या सुटणार नाहीत. आता कढाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू.तेल तापले की गॅस मंद आचेवर करून ह्या बाकरवड्या तेलामध्ये मस्त छान खरपूस तळून घेऊ.
- 7
चविष्ट, खुसखुशीत आणि खमंग अशीही बाकरवडी खायला खूप मस्त लागते. थोडी वेगळी चव हवी असल्यास,त्यामध्ये लाल मिरची ऐवजी तुम्ही हिरवी मिरची लसणाची चटणी सुद्धा घालू शकता.आणि थोडे शेंगदाण्याचा कूट पण घालून बनवू शकता.खूप छान चव येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडीची मस्त थीम मिळाली.केली खमंग, कुरकुरीत बाखरवडी चहासोबत खायला.मस्त झाली. Preeti V. Salvi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे Swara Chavan -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडीचहा सोबत किंवा मधल्या वेळात खायला चटपटीत आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे बाकरवडी. Supriya Devkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
मिनी बाकरवडी (mini bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी तशी पुण्यातली आणि पुणे म्हटलं की चितळे बंधू ची बाकरवडी सर्वात फेमस, बाकरवडी तशी मला लहान पणापासून आवडते, तसे बाकरवडी मध्ये भरपूर प्रकार आहेत पण मला मिनी बाकरवडी खूप आवडते, जेव्हाही माहेरी गेली कि मी 1 मिनी बाकरवडी चा पॅकेट नक्की नेते किंवा मम्मी आधीच आणून ठेवते माझ्यासाठी. Cookpad च्या या थीम मुळे मला ते स्वतः बनवायला मिळाले, पूर्वी मी बाकरवडी कधी घरी बनवली नव्हती, ही मी पहिल्यांदाच बनवत आहे आणि खूप छान झाली, एकदम खुसखुशीत आणि बाजारात मिळते अगदी तशीच. Pallavi Maudekar Parate -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12आजची बाकरवडी मी खास माझ्या नवऱ्यासाठी बनविले आहे . यात मी बेसन पीठाचा वापर केलेला नाही, मी यात तूर दाळ आणि मसुर दाळ पीठाचा वापर केलेला आहे, Arati Wani -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#बाकरवडी क्रिस्पी बाकरवडीबाकरवडी म्हणजे ऑलटाइम फेवरेट स्नॅक.सर्वांच्याच परिचयाची आणि सर्वांना आवडणारी.बाकरवडी खाण्याचा आनंद काही निराळाच असतो.सहज तोंडात टाकायला आवडणारी छान,चमचमीत,कुरकुरीत,खुसखुशीत स्वादिष्ट घरघूती बाकरवडी.ही खाऊन लगेच फस्त करायची असते टिकवायची अजिबात नसते .कुठलाही पदार्थ करताना त्यातलं प्रमाण मस्त जमावं लागतं आणि तो पदार्थ करण्याचा आनंद घ्यावा लागतो. तेवढी काळजी घेतली, की उत्तम पदार्थ तयार ! प्रत्येकाच तिखट मिठाच प्रमाण कमी जास्त असू शकत. Prajakta Patil -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 # बाकरवडीमहाराष्ट्राची पारंपारीक रेसिपी बाकरवडी हि तिखट गोड आंबट अशी चविला लागते स्नेक्स म्हणुन किंवा कधीही खाता येते ८-१५ दिवस टिकते .चला तर बघुया बाकरवडी कशी करायची ते Chhaya Paradhi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week12खुप दिवसांनी बाकरवडी करण्याचा योग आला..कूक पॅड मुळे खूप काही शिकायला मिळते आहे,बाकरवडी नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि स्पेशली मॉर्निंग च्या चहा कॉफी सोबत एकदम छान आहे...बाकरवडी केल्यावर मुलांनी पटकन गरम-गरम संपली पण,, इतकी छान हि बाकरवडी झाली...चला तर करुया बाकरवडी...🤩 Sonal Isal Kolhe -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीआज मी बाकरवडी पहिल्यांदाच ट्राय केली आहे.चवीला छान झालीच ,बनवायला पण खूप मज्जा आली Bharti R Sonawane -
-
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी असलेला उत्तम पर्याय म्हणजे बाकरवडी. मुलांनाच नाही तर मोठ्या ना देखील आवडणारा पदार्थ...आंबट गोड तिखट अशी मस्त चव असते या बाकरवडी ला... डब्बा मध्ये भरून दहा ते पंधरा दिवस तुम्ही वापरू शकता.एवढी मस्त टिकणारी चटपटीत रेसिपी म्हणजे *बाकरवडी*. Vasudha Gudhe -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12बाकरवडी, 'स्नॅक्स' किंवा आपल्या 'फराळ' वर्गातील एक स्टार, नव्हे सुपर स्टार पदार्थ. इथे मुंबई आणि विरारमध्ये राहिलेल्या माझ्यासारख्या मुलीला अगदी आता काही वर्षांपूर्वी पर्यंत पुण्याच्या बाकरवडीचे फॅसिनेशन होते. कुणी पुण्याहून येणार असले म्हणजे आठवणीने बाकरवडी घेऊन येण्याचा निरोप जायचा. आता तोच सेम ब्रॅन्ड गल्लोगल्ली उपलब्ध झाल्यावर कुणीतरी खास वेळ काढून, रांगेत उभे राहून, आपल्यासाठी ती बाकरवडी आणली आहे ही भावनाच हरवली. कुकपॅडची बाकरवडीची थीम आली आणि एका नव्या फॅसिनेशनचा जन्म झाला. स्वतः बाकरवडी बनविण्याचा! मग सुरु झाला शोध, अनेक उपलब्ध रेसिपींमधुन पारंपारीक आणि त्याच जुन्या खुसखुशीत बाकरवडीच्या रेसिपीचा शोध. वेगवेगळ्या रेसिपींच्या मदतीने तयार झाली ही रेसिपी. मी ही रेसिपी अक्षरशः साजरी केली. फोटो पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच. त्या जुन्या पारंपारिक चविच्या खूप जवळ जाता आले याचा आनंद आहे. तो आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करते आहे... Ashwini Vaibhav Raut
More Recipes
टिप्पण्या