वॉलनट बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी

प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते. बाकरवडी म्हटले की डोळ्या समोर येते ती चितळे ची बाकरवडी आणी ती स्पैशल चव... पण म्हटले आपण वेगळे चवीचे प्रयोग करतच असतो तर बाकरवडी ला पण आपला ट्वीस्ट देऊन पहावा. आणी आजकाल हेल्थ, डाएट अणि पदार्थाची पौष्टिकता सगळयांचा विचार करुनच हा प्रयोग करायचा प्रयत्न केला आणी खरच उत्तम व चविष्ट अशी बाकरवडी उदयास आली.. चला तर पाहुया ही रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
20- 24 नग
  1. 35 ग्रॅमवॉलनट (आक्रोट)
  2. 2 टेबलस्पूनधणे
  3. 2 टेबलस्पूनतिळ
  4. 2 टेबलस्पूनखसखस
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनकश्मिरी लाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  11. 2 टेबलस्पूनईम्ली सौस
  12. 1 वाटीकणिक
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. 1/4 टीस्पूनमीठ
  15. पाणी
  16. तळण्या साठी तेल
  17. 1 टीस्पूनओवा

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम आक्रोट अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. धणे,जीरे,तिळ,खसखस भाजुन घ्या. कणिक (मैदा घेतला तरी चाललेले) घेउन त्यात तेल मीठ ओवा घालुन छान मळुन घ्या म्हणजे तेल कण्केला व्यवस्तीत लागेल मग थोडे पाणी घालुन गोळा भिजून घेणे.

  2. 2

    आत्ता भिजवलेले आक्रोट व भजलेले धणे तिळ खसखस जीरे मिक्सर मधे वाटुन घ्या. हे मिश्रण कढईत घेउन त्यात तिखट हळद मीठ हिंग व लिंबाचा रस व किंचीत साखर घालुन चार ते पाच मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आत्ता भिजवलेल्या कण्कीच्या गोळ्याची पोळी लाटून घ्या. त्या वर चिंचेची चटनी किंवा सौस लावा त्यावर आक्रोट चे सारण पसरवून हलकेच दाबुन घ्या.

  4. 4

    आत्ता फोटोत दाखवल्या प्रमाणे रोल करा व समान असे छोटे काप करुन घ्या

  5. 5

    एक काप हातावर घेउन हलकेच दाबुन घ्या असे सगळेच बाकरवडी करुन ठेवा. व तेल गरम करुन कमी आचे वर तळून घ्या की आपली बाकरवडी तैयार. गरम किंवा थंडी बाकरवडी सर्व्ह करु शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes