उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सारण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये तुप घालून त्यामध्ये किसलेला नारळ घाला व ते चांगले परतून घ्यावे. मग नारळ परतून झाल्यावर त्यामध्ये गूळ घालावा व विरघळून होईपर्यंत चांगले परतावे. मग त्यामध्ये खसखस, वेलची व जायफळ पूड घालावी व हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे.
- 2
मग एका वाटीमध्ये सजावटीसाठी दूध गरम करून त्यामध्ये केसर काड्या घालाव्यात.
- 3
मग एका पातेल्यामध्ये पाणी, दूध व तूप घेऊन ते उकळून घ्यावे याला चांगली उकळी आली की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालावे व चांगले घोटून घ्यावे. मग ते पीठ एका ताटामध्ये घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालून ते एकजीव करून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करावेत.
- 4
मग त्या छोट्या पिठाच्या गोळ्यांची पुरीसारखी पारी लाटून त्याला बाजूने कळ्या पाडून घ्याव्यात व त्यामध्ये तयार मिश्रण घालावे. मग ते मोदक बंद करून त्यावर सजावटी साठी तयार केलेले केसर लावावे. मग आपले मोदक एका भांड्यात वीस मिनिटे उकडण्यासाठी ठेवावेत. अशाप्रकारे आपले मोदक तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरयाउकडीचे मोदक हे पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात. Purva Prasad Thosar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक मोदक म्हणजे गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पदार्थ, म्हणूनच आज मी आणि माझ्या बाप्पासाठी पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक केले आहेत. त्याची रेसिपी तुम्हा सर्वांना बरोबर शेअर करते तुम्हाला हि खूप आवडतील. Sushma Shendarkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकPost 1आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारे पक्वान्न म्हणजे मोदक.त्यामुळे नैवद्यात मोदकांना कायमच अग्रस्थान असते. आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचा पाहुचणार करण्यासाठी त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो.बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. मोदक तळून आणि वाफवून अशा दोन प्रकारे तयार केले जातात. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक घरोघरी बनवले जातात. स्मिता जाधव -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक गणपती बाप्पा चे फेवरेट असे गोड उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कोकणात बनवले जातात गणपती उत्सव या शिवाय पुर्ण होत नाही उकडीचे मोदक व वरुन साजुक तुप यांची काही बातच और तोंडाला पाणी सुटले पाहिजे कधी एकदा ते खातो असे होते आमचं Nisha Pawar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरु होते. बाप्पांच्या आगमनाने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. घरोघरी सुंदर आरास केली जाते. सुगरणी छान सुग्रास पदार्थ नैवेद्यासाठी बनवतात. पण या सगळ्या पदार्थांमधे अग्रेसर पदार्थ असतो तो म्हणजे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक. मोदक हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. काही ठिकाणी उकडीचे मोदक तर काही ठिकाणी तळलेले मोदक बनवले जातात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवताना. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बनणारे तांदळाचे उकडीचे मोदक Deepali Amin -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआज बहुतेक घरी गणेशाचे आगमन झाले आहे, त्यानिमित्त गणेशाचा आवडीचा मोदक घरोघरी बनला जातो . मोदक हा प्रसादामध्ये प्रसादाचा राजासारखा भासतो. मोदक बनविण्यात त्याला आकार देण्यात वेगळीच उत्सुकता वाटते. Jyoti Kinkar -
उकडीचे कलश् मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#उकडीचेकलशमोदक,,, ऊँ गणेशाय नमः Mamta Bhandakkar -
उकडीचे आमरस मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#GA4 #week8#आमरस मोदक आज संकष्टी मग बाप्पाला आवडते मोदक नैवेद्य म्हणून केले पण कुकपॅड साठी वेगळे केले तसे हे मोदक करते मी गणपती असतो तेव्हा आज तुम्हा सर्वांसाठी बघा बर जमलेत का? माझ्या कडे नेहमीच आमरस फ्रीज मधे स्टोअर केलेला असतो. (Steam शब्द वापरून) Hema Wane -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक22/8/2020 आज च्या दिवशी गणपती बाप्पाचा आगमन झालं आहे . आम्ही इंडियाला जाऊ शकत नाही कारण यावर्षी लोकडाऊन मुळे कुठेही जाता येत नाही. गणपतीला आम्हाला इंडियाला जाता आलं नाही. म्हणून आज देव्हाऱ्यासमोर निवदय दाखवलं आहे. Sapna Telkar -
पारंपारिक उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक रेसिपी 1 Varsha Pandit -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकनाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏 Priyanka Sudesh -
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकउकडीचे मोदक हे गणपतीचे सर्व प्रिय.बनवायला फारच सोपे आणि चवीला तेवढेच उत्तम.गणपतीचे सण म्हटले की परिवार, मोदक, हास्य, विविध खाद्य हे सर्वच आले.या वर्षी गणपतीला पहिल्यांदाच मी उकडीचे मोदक याचा नैवेद्य दिला.आणि मला खात्री आहे की हा नैवेद्य माझ्या बाप्पाला नक्कीच आवडला आहे.हे मोदक कधीच एकट्याने बनवायचे नसतात तर एकत्र सगळं कुटुंब असावे व एकमेकांसोबत गोष्टी करत हे मोदक बनवावे आणि बघा मग किती गोडवा या मोदकात येणार!!!! Ankita Khangar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदकगणेशोत्सव स्पेशल मोदक shamal walunj -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकसर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छाआज मी आपले पारंपारिक तांदळाच्या उकडीचे मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआपल्या सर्वांचे दैवत श्री गणेश म्हणजेच विघ्नहर्ता.... गणेश म्हणजे बुद्धी सिद्धी यांचे प्रतीक. अशा या गणेश भगवंतासाठी मी पारंपारिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य बनवला पहा तर कसे झाले आहेत.....चला पाहुयात कसे बनवले ते...... Mangal Shah -
उकडीचे केसर पिस्ता मोदक (ukdiche kesar pista modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पासाठी त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक आपण नेहमी करतो पण त्यातही बाप्पासाठी काहीतरी शाही करावा असा वाटलं. त्यातून हि रेसिपी तयार झाली. Manali Jambhulkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमी मुळची औरंगाबाद ची आमच्या मराठवाड्यात गणपतीला तळणीचे मोदक करायचीच परंपरा पण मी पुण्यात शिफ्ट झाले आणि इथल्या रिती ही शिकले. आधी मला हातवळणीचे उकडीचे मोदक काही जमायचे नाहीत मग मी साचा वापरला पण तो हातवळणीची सुबकता काही ह्या मोदकांना येइना मग मी हे हातवळणीचे मोदक शिकले आणि आता अगदी घरचे वाट बघतात कधी उकडीचे मोदक होतील ह्याची😊 आज गणरायाच्या आगमनासाठी हे तळणीचे आणि उकडीचे मोदक.बाप्पा मोरया🌺🙏योगायोग म्हणजे ही माझी #cookpad वरती पोस्ट केलेली 100 वी रेसिपी.😊 Anjali Muley Panse -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#उकडीचे मोदक ,अंगारीका संकष्टी म्हणुन आज मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले . Nanda Shelke Bodekar -
उकडीचे मोदक (अचूक उकड सहित) (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा मोरया 🙏🌹गणेश च आगमन झाल्यावर जाणू सर्वीकडे आनंदच आनंद येतो.सर्वांचं विघ्न दूर करणाऱ्या अशा ह्या विघ्णहर्ता गणेश ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य दिले जाते, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक नाही बनवलेत तर जणू सर्व अपूर्णच. त्याची चव बाकी कुठलेच मोदक घेऊ शकत नाही. अशे सर्वांचे आवडते मोदक कसे बनवायचे तर चला पाहुयात. Deveshri Bagul -
ड्राय फ्रुट उकडीचे मोदक (dryfruit ukadiche modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया🙏🌹🙏 गौरी -गणपती उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक मी आज बनविलेल्या आहे,तर मग पाहुयात ड्राय फ्रूट उकडीचे मोदक रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या