उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4
मैत्रिणींनो , मी आज पराठ्याचा हा प्रकार आणलाय...उपवासाचा पराठा....गरमागरम मस्त लागतोय....सोबत उपवासाची कढी...अहाहा...किंवा शेंगदाणा दह्याची चटणी....

उपवासाचे पराठे (upwasacha paratha recipe in marathi)

#GA4
मैत्रिणींनो , मी आज पराठ्याचा हा प्रकार आणलाय...उपवासाचा पराठा....गरमागरम मस्त लागतोय....सोबत उपवासाची कढी...अहाहा...किंवा शेंगदाणा दह्याची चटणी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
5 पराठे
  1. 2/3 मेझरींग कप भिजलेला साबुदाणा
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे उकडून बारीक करुन
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणा कुट
  4. 4 टेबलस्पूनराजगि-याचे पीठ
  5. 3 टेबलस्पूनभगरीचे पीठ
  6. 4हिरव्या मिरच्या
  7. 1 टीस्पूनजिरे
  8. चवीनुसार मीठ
  9. 3 टेबलस्पूनगाजराचा कीस
  10. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    प्रथम एक तास भिजलेला साबुदाणा मिक्सरपाॕटमध्ये बारीक करुन घ्यावा. त्यानंतर त्यात उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे टाकून पुन्हा चांगले फिरवून घ्यावे.

  2. 2

    आता मिक्सर मधील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे, व त्यात राजगि-याचे पीठ, भगरीचे पीठ, शेंगदाणा कुट, गाजराचा कीस, व चवीनुसार मीठ घालून चांगले एकञ करुन घ्यावे. तव्यावर थापता येईल एवढेच घटृ असावे.

  3. 3

    आता गॅस सुरु करुन त्यावर तवा ठेवावा. तव्यावर ब्रशने तेल पसरवून घ्यावे. आता हाताला पाणी लावून हातावर तयार मिश्रणाचा गोळा घेऊन हातावरच थापून पुरीचा आकारात पराठा तयार करावा. नंतर गरम तव्यावर ही पुरी टाकून त्याला. हाताला पाणी लावून जेवढे पातळ करता येईल, तेवढे पातळ करावे..वरुन तेल टाकावे. व झाकण ठेऊन 1 मिनीट शिजवावे.

  4. 4

    त्यानंतर झाकण काढून पराठा परतवून घ्यावा. वरुन तेल टाकावे. अशाप्रकारे पराठा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे.

  5. 5

    अशाप्रकारे सर्व पराठे तयार करुन घ्यावेत. हे पराठे शेंगदाणे दह्याची चटणी किंवा उपवासाच्या कढीसोबत गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes