मिसळ पाव (misal pav recipe in marathi)

#पश्चिम #महाराष्ट्र #मिसळ पाव
#मिसळपाव....बस नाम ही काफी है...
कां,कधी,कशाला...असं फुटकळं प्रश्न इचारु नगा बाबांनु...मी काय उत्तर द्यायाची नाय..कसं असतं नं आपलं....आली लहर अन केला कहर
प्वोटात भुकेचा आगडोंब उसळला असलं त्याच टायमाला हून जाऊदे... म्हंजे भुकेच्या आगीला भन्नाट,,सैराट🌶️,झिंगाट,🤩 तेजतर्रार#मिसळीची आग फस्सक्लास काम करील
काय म्हनता..लागली व्हयं भूक..मंग चला बिगी बिगी... आन् हान सख्या हरी..कान कान कान माझ्या वडिलांचे अस्सल सातारी वाक्य हाय लेकोनिवांत हुद्या..मिसळपावा संगट मायंदाळ कांदा कोथिंबीर फरसाण चिवडा दिलाय बगा..ती तर्री तर नाद खुळाच..तिच्या निस्त्या वासानं आन् रंगानं मिसळीच्या आगमनाची वर्दी पोचेलच बगा टकुर्यात (मेंदू मध्ये)...आई शप्पत पोचली म्हनताय..आंग आक्षी..करा सुरुवात आन् घ्या पयला घास..दिली नव्हं जीभेनं सलामी...मिसळीच्या झणक्यानं दिला का नाय दणका..त्ये पहा तुमच्या नाकातोंडातून पाणी वहाया लागलं,त्ये तुमचं नाक कान तापून लाल लाल झाल्यात..त्यो घाम बघा कपाळावर..पार घाम काढला वो तुमचा..आरं बाबानु याचा अर्थ म्हंजी आपली मिसळ जीभेवरुन खाली उतरुन थैमान घालतीया समद्या शरीरामंदे..काय म्हनता आता मी बोलू नगं ...चालतंय की..पर तुमचं चालू द्या बर्रका..पार तुमचं मन आत्मा तुरुप्त होईपत्तुर खावा...
अशी ही जिव्हा ,मन,आत्मा तृप्त करणारी, संपल्यावरही बोटांवर आपल्या वासातून रेंगाळणारी मिसळ रांगड्या महाराष्ट्राची शान आहे..आणि मिसळीचे देखील हेच रांगडेपण पुनः पुन्हा आपल्याला तिच्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित करते..चला तर मग मिसळीला हे रांगडेपणं कसं प्राप्त होतं ते पाहू या...
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र #मिसळ पाव
#मिसळपाव....बस नाम ही काफी है...
कां,कधी,कशाला...असं फुटकळं प्रश्न इचारु नगा बाबांनु...मी काय उत्तर द्यायाची नाय..कसं असतं नं आपलं....आली लहर अन केला कहर
प्वोटात भुकेचा आगडोंब उसळला असलं त्याच टायमाला हून जाऊदे... म्हंजे भुकेच्या आगीला भन्नाट,,सैराट🌶️,झिंगाट,🤩 तेजतर्रार#मिसळीची आग फस्सक्लास काम करील
काय म्हनता..लागली व्हयं भूक..मंग चला बिगी बिगी... आन् हान सख्या हरी..कान कान कान माझ्या वडिलांचे अस्सल सातारी वाक्य हाय लेकोनिवांत हुद्या..मिसळपावा संगट मायंदाळ कांदा कोथिंबीर फरसाण चिवडा दिलाय बगा..ती तर्री तर नाद खुळाच..तिच्या निस्त्या वासानं आन् रंगानं मिसळीच्या आगमनाची वर्दी पोचेलच बगा टकुर्यात (मेंदू मध्ये)...आई शप्पत पोचली म्हनताय..आंग आक्षी..करा सुरुवात आन् घ्या पयला घास..दिली नव्हं जीभेनं सलामी...मिसळीच्या झणक्यानं दिला का नाय दणका..त्ये पहा तुमच्या नाकातोंडातून पाणी वहाया लागलं,त्ये तुमचं नाक कान तापून लाल लाल झाल्यात..त्यो घाम बघा कपाळावर..पार घाम काढला वो तुमचा..आरं बाबानु याचा अर्थ म्हंजी आपली मिसळ जीभेवरुन खाली उतरुन थैमान घालतीया समद्या शरीरामंदे..काय म्हनता आता मी बोलू नगं ...चालतंय की..पर तुमचं चालू द्या बर्रका..पार तुमचं मन आत्मा तुरुप्त होईपत्तुर खावा...
अशी ही जिव्हा ,मन,आत्मा तृप्त करणारी, संपल्यावरही बोटांवर आपल्या वासातून रेंगाळणारी मिसळ रांगड्या महाराष्ट्राची शान आहे..आणि मिसळीचे देखील हेच रांगडेपण पुनः पुन्हा आपल्याला तिच्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षित करते..चला तर मग मिसळीला हे रांगडेपणं कसं प्राप्त होतं ते पाहू या...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बारीक मटकी स्वच्छ धुऊन आठ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर चाळणीत उपसून ठेवा. आणि त्यावर झाकण ठेवा. आठ-दहा तासाने चांगले मोड आलेले दिसतील. आता ही मोड आलेली मटकी कुकर मध्ये घाला, त्यात पाणी आणि चिमूटभर हळद घालून दोन शिट्ट्या काढून घ्या.आपल्याला मटकी फार मऊ शिजवून घ्यायची नाहीये.
- 2
एकीकडे आलो मिरची लसूण पेस्ट करून घ्या. दोन कांदे दोन टोमॅटो बारीक चिरून घ्या. राहिलेले दोन कांदे अगदी बारीक चिरून ठेवा. हे कांदे आपल्याला मिसळीवर वरून घालायचे आहे. कोथिंबीरही चिरून ठेवा.
- 3
बारीक चिरलेल्या कांदा टोमॅटोची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
- 4
आता कढई तापत ठेवा. त्यात तेल घाला. तेल तापल्यावर त्यात मोहरी जिरं हिंग हळद घालून खमंग फोडणी करून घ्या.आता यात कडिपत्ता घाला. नंतर या मध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालून चांगले परतून घ्या
- 5
मग यात आलं मिरची लसूण पेस्ट घाला आणि व्यवस्थित परतून घ्या थोड्यावेळ झाकण ठेवून 2-3वेळा वाफा काढाव्यात.नंतर यामध्ये लाल तिखट,काश्मिरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला,गोडा मसाला घालून मिश्रण व्यवस्थित परतून घेणे आणि त्याला परत दोन-तीन वाफा काढणे. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर,गूळ घालणेआणि मिश्रण व्यवस्थित परतून घेणे.
- 6
वरील मिसळीच्य मिश्रणाला तेल सुटू लागले की त्यामध्ये चार ते पाच कप गरम पाणी घाला. पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकता. आता मीठ घालावे. आणि हे मिश्रण खळखळून उकळून घ्यावे.
- 7
ही झाली आपली तर्री तयार.. यातील थोडी तरी बाजूला वाडग्यात काढून ठेवा, आता यात शिजवलेली मटकी घालून उसळ व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि झाकण ठेवून तीन-चार वाफा काढाव्यात. नंतर यात कोथिंबीर घालून उसळ परत ढवळून घ्यावी.ही झाली आपली मिसळीची उसळ तैय्यार..
- 8
एका डिशमध्ये बाऊल ठेवावेत.त्यामध्ये मटकीची उसळ,शेव फरसाण,कांदा कोथिंबीर, लिंबू,तर्री,घालून ठेवावी..सोबत ताक,एखादा गोड पदार्थ देऊन डिश सर्व्ह करावी..
- 9
Similar Recipes
-
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#मिसळपावमिसळ ही सगळ्यांची आवडती अशी एक डिश..प्रत्येक भागात ती वेगळी मिळते. अशीच माझी ही झणझणीत पण थोडी आंबट गोड अशी मिसळ. जान्हवी आबनावे -
मिसळ पाव (misal pav recipe in Marathi)
#स्नॅक्स # मिसळपाव सगळ्यांच्या आवडीची व पोटभरीची स्नॅक्स डिश म्हणजे मिसळपाव झटपट होणारी रेसिपी चला तर बघुया मिसळपाव रेसिपी Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर वरून ही रेसिपी केली आहे. मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांतात थोड्या फार वेगळ्या प्रकारात बनवला जातो.हल्ली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होत असतात. त्यात होणारी गर्दी पहिली की लोकमिसळ पाव च्या किती प्रेमात आहेत ते कळते. त्यासाठी आज मिसळ पाव बनवली आहे. Shama Mangale -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#crभन्नाट कॉम्बो...महाराष्ट्राची शान म्हणजे तर्रीदार मिसळ जोडीला पाव म्हणजे चव व पोटभरीच कॉम्बो जो अगदी कमी जणांना आवडत नसेल माझे शेजारी गुजराती पण त्यांनाही मी मिसळ पाव ची गोडी लावलीय आधी खाऊ घातल... मग शिकवल आता सर्र्स ते करतात व खूप एन्जॉय करतात Charusheela Prabhu -
पुणेरी मिसळ /मिसळ पाव (misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटनक्षेत्रमिसळ हि कोल्हापूर, नासिक, पुणे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चवीची बनते.पुणेरी मिसळ बनवायला मला एक कारण बनलं. ह्या मिसळ मुळे जुन्या आठवणी जागे झाल्यात मी पुण्याला शिकायचे तेव्हा हॉस्टेल मध्ये राहायचे व माझी मेस लावलेली होती. कधी कधी खूप भूक लागायची मग आम्ही सर्व मैत्रिणी जमून बेत करायचो पुणेरी मिसळ खायला जायचा. मी आज ती मिसळ कूकपॅड च्या थिम मुळे घरी बनवली.थँक्स कूकपॅड 👌🙏 Deveshri Bagul -
-
पुणेरी मिसळ...खमंग संस्कृती (misal recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज. #पुणेरी _मिसळजैसा गाव_वैसी मिसळ...😋 महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक चविष्ट चवदार चमचमीत खमंग अध्याय..हा अध्याय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात अगदी भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने वाचला जातो...एवढेच नव्हे तर जगभरात मराठी माणसाचा अत्याधिक आवडीचा अध्याय.. त्यामुळे वरचेवर घराघरात वाचला जातोच..पण जशी प्रत्येक घराची,प्रांताची एक विशिष्ट परंपरा, विशिष्ट चव,खाद्यसंस्कृती आहे...तेथील भौगोलिक परिस्थिती नुसार उपलब्ध पीके ,मसाले यांची गोळाबेरीज करुन प्रत्येक जिल्ह्यानुसार मिसळीची वैशिष्ट्य पूर्ण चव ,मिसळीमधले signature variations आपल्याला पहायला मिळतात.. कोल्हापूरची झणझणीत मिसळ,सातारची तेजतर्रार मिसळ,सांगली सोलापूरची चमचमीत मिसळ तर पुणेरी गोडा मसाला,गूळ घालून केलेली चमचमीत, स्वादिष्ट मिसळ,तर काही वेळेस झटपट मिसळ..असे एक ना अनेक प्रकार रसना तृप्त करायला कायम सज्ज आहेत..ते ही 24×7....मिसळ खायला ठराविक वेळ नसते..असतो फक्त mood..😀म्हणूनच तर मिसळ पाव बस नाम ही काफी है..!!!!!😍😋 चला तर मग आज आपण मिसळीचा पुणेरी अध्याय वाचू या.. Bhagyashree Lele -
पुणेरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमिसळ पाव म्हटलं की, आपल्याला लगेच पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, या शहराची आठवण होते. पण प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मिसळ सोबत ब्रेड देतात. तर काही ठिकाणी मी सोबत पाव देतात. पण मी माझ्या पद्धतीने मिसळ पाव बनविलेला आहे. Vrunda Shende -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#शुक्रवार_मिसळ पावपाहूनच तोंडाला पाणी सुटणारी मिसळ पावबऱ्याच प्रकारे ओळखली जाते लाल रसरशीत रस्सा आणि त्यामध्ये मटकीची उसळ, फरसाण,कांदा,लिंबू आणि सोबत पाव पर्वणीच नाही का.... Shweta Khode Thengadi -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ, दही मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात. Prachi Phadke Puranik -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फ्रूट रेसिपीज स्पेशल या किवर्ड साठी मी माझी मिसळ पाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झणझणीत मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
मिसळ पाव....सगळ्यांचा आवडता नाश्ता😊झणझणीत मिसळ..त्यावरून टाकलेले फरसाण, कांदा-कोथिंबीर आणि लिंबू.... सोबतीला नरम लुसलुशीत पाव...!!मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…अशी ही तर्री वाली मिसळ खायचा मोह तर होतोच. Sanskruti Gaonkar -
मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # मिसळपाव उच्चरताच तोंडाला पाणी सुटत ना चला तर मटकी मिसळपाव रेसिपी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर #मिसळ पावमहाराष्ट्रीयन स्नॅक्समध्ये मिसळ पाव हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचवेळा नाश्ता आणि जेवण यांचा सुवर्णमध्य साधणारा सर्वात उत्तम मेनू . सध्या थंडीचा मौसम आहे, अशावेळी चमचमीत, तिखट, तर्रीदार अशी ही मिसळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि अशावेळी न खाणारा खवय्या विरळाच!! आज मी ही अशीच झणझणीत मिसळीची रेसिपी देत आहे. Namita Patil -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी चौथी पाककृती मी सादर करत आहे - "मिसळ पाव".ही आमची फॅमिली डिश म्हणतो आम्ही 😜 अगदी पिढीजात.. गौरी-गणपतीला सर्व एकत्र जमले की सकाळी नाष्टा बनवायला वेळ नसतो बायकांना, दुपारच्या जेवणाचीच डायरेक्ट तयारी सुरू होते. मग मिसळ आणि वडा पाव पार्सल आणला जातो. सकाळी यथेच्छ सह - नाष्टा होऊन पुढील दिवसाची सुरुवात होते आमची 😃 शिमग्यात आमच्याकडे पहाटे पालखी येते. देव भेटून गेला की आमची स्वारी "रसराज" किंवा "गोपाळ" कडे वळते 😋 तिथे मिसळपाव ठरलेला. मी महाराष्ट्र मधल्या ज्या ज्या भागांत राहिले आहे(सिंधुदुर्ग, पुणे, रत्नागिरी, मुंबई) त्या सगळ्यांची थोडी थोडी style कॉपी करत आजची मिसळ पाव बनवली आहे. गोड मानून घ्यावी 🤗 सुप्रिया घुडे -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#मिसळ पावमहाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ पाव. झणझणीत तर्री आणि त्यात मटकी सोबत भिजलेला फरसाण वरून पिळलेले लिंबू पावासोबत खाताना वेगळ्या विश्वात जातो आपण. आणि त्यात मटकी चागंली मोड आलेली असेल तर मजाच Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#wdr मोड आलेली मटकी त प्रोटीनची मात्रा भरपूर असते. स्नायू मजबूत होतात. सेवनाने शरीराला उर्जा मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते. शरीर निरोगी राहाते. वजन घटवण्यास मदत होते. शूगर नियंत्रणात राहाते. मटकीत क जीवनसत्वे प्रामुख्याने आढळते. मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे अतिताणावर ही नियंत्रण ठेवते. चला तर अशा मोड आलेल्या मटकी पासुन मिसळ पाव रेसिपी कशी बनवायची ते बघुया सकाळी नाष्ट्या साठी पोटभरीचा चमचमीत मेनु Chhaya Paradhi -
झणझणीत मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#SFR #स्ट्रीट फूड स्पेशल रेसिपी पोटभरीचा नाष्टा किंवा जेवण म्हणजेच झणझणीत मिसळ पाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
झणझणीत नागपुरी मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#cr#मिसळ पावमिसळ सर्वत्र बनते ,वेगवेगळ्या पद्धती ने आमच्या कडे खास नागपुरी चवी ची मिसळ सर्वांना आवडते , पाहिल्या बरोबर ती खावीशी वाटली पाहिजे.अशीच आजची मिसळ पाव . Rohini Deshkar -
मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#SDRझणझणीत मिसळ पाव हा चवीलाही छान लागतो व पोटभरीचा मेनू Charusheela Prabhu -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#कॉम्बो रेसिपीज कॉन्टेस्ट#ks1मिसळपाव म्हटलं की लगेच तोंडात पाणी आल्यासारखं झालं मस्त गरमागरम झणझणीत अशी मिसळपाव... मिसळ पाव म्हटलं की साधारणता मिसळ मसाला तयार करावा लागतो पण आज मी रेडी bitta पॅकेट घेऊन मिसळ बनवली आहे . चला तर मग रेसिपी बघूया.. इन्स्टंट Gitalharia -
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#md माझी आई सुगरण आहेच पण नवनविन रेसिपी सुद्धा आजही८७ वयातही करत असते. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय लहानपणा पासुन आईचा नियम पदार्थ बनवताना मलाही तो पदार्थ करावा लागायचा अनेक वेळा चुकायचा पण केलाच पाहिजे हा नियमच त्यामुळे मोदक, आळुवडी असे लहानपणी कंटाळवाणे पदार्थ ही आता सहज जमतात मी माझ्या दोन्ही मुलींना व मुलालाही सैंपाकात मला मदत करायला लावतेच चला आज माझ्या आईच्या हातचा मला आवडणारा पदार्थ मिसळपाव मी तुम्हाला दाखवते( आईच्या हाता ची चव येणार नाही पण प्रयत्न करते.) माझी आई व्हेज नॉनवेज दोन्ही प्रकारच्या रेसिपीत पारंगत आहे Chhaya Paradhi -
-
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
झणझणीत मिसळ पाव (zhanzhanit misal pav recipe in marathi)
#स्नॅक्स#2#मिसळपाव कूकपॅड मुळे खरच नवनविन रेसिपी रायला उत्साह येतो. आणि स्नॅक प्लॅनिंग मुळे तर खरच मदत होतेय आणि वेळेचीही बचत होते. असाच एक स्नॅक मधला पदार्थ म्हणजे मिसळपाव....मिसळ करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.नाव ही वेगवेगळे असतात,पुणेरी मिसळ,कोल्हापुरी चटका मिसळ,ईत्यादी. पण मी मात्र माझ्या पद्धतीने मस्त नागपुरी झणझणीत मिसळ केली आहे.हि मिसळ झणझणीत तर आहेच शिवाय स्वादिष्ट ही आहे.आणि सोबतच पौष्टीक ही.... Supriya Thengadi -
मिसळ-पाव (misal pav recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 6पश्चिम महाराष्ट्रातील मिसळ-पाव ही प्रसिध्द रेसिपी आहे. प्रत्येक ठिकाणी मसाले वेगवेगळे वापरले जातात.जसे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट. Sujata Gengaje -
चटकदार मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKगोड गोड खाऊन झाल्यावर तोंडाला चव आणणारी चटकदार मिसळ खूप छान होते Charusheela Prabhu -
झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव प्लॅटर. (zhanzhanit kolhapuri misal pav platter recipe in marathi)
#स्नॅक्स- ५महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती इतक्या मस्त मस्त चटकदार पदार्थांनी समृद्ध आहे की एकेका पदार्थाचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटतं..😋😋त्यात लालभडक तर्रीवाली मिसळ खायची म्हणजे नुसतं वॉव…. सुटलं ना तोंडाला पाणी नुसतं नाव निघाल्याबरोबर?चला ,तर पाहूयात रेसिपी.घरी बनवलेल्या मिसळ मसाला सोबत Deepti Padiyar -
मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
#MWKमाझी विकेन्ड स्पेशल रेसिपी 😋मिसळ म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण हा पदार्थ त्याच्या झणझणीत पणामुळे आणि त्याच्या चवीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि हा पदार्थ लोक हॉटेल मध्ये, धाब्यामध्ये किंवा घरामध्ये अगदी आवडीने खातात. मिसळ हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि तो कमी वेळेत बनत असल्यामुळे गडबडीच्या वेळी आपण मिसळ बनवून खावू शकतो. मिसळ पाव हा मटकीच्या मोडाच्या आमटीचा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड प्रकार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते जसे कि काही ठिकाणी मटकीच्या मोडाची आमटी बनवली जाते. तर काही ठिकाणी मिक्स मोडाची म्हणजेच त्यामध्ये मटकी, मुग, वाटणे, मसूरा, आणि हरभरे या सारखी कडधान्ये असतात आणि या कडधान्यांना मोड आणलेले असते. तर आज मी बनवली आहे मटकी आणि कुळीथाच्या मोडाची मिसळ, चला तर मग याची रेसिपी बघुया... Vandana Shelar
More Recipes
टिप्पण्या (6)