स्विटकाॅर्न पुलाव (sweetcorn pulao recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#GA4 #week8 #pulao
लंच किंवा डिनर साठी वन डिश मील म्हणून मस्तपैकी पुलाव करणे खूप सोपे असते. पुलाव हा खूप प्रकारे बनवता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, उसळी, मसाले किंवा काहीच मसाले न घालता साधा पुलाव तसेच नाॅनव्हेज पुलाव पण करतात. आज गुरुवार म्हणून आमच्या कडे फक्त व्हेज जेवण बनवतात. रात्रीच्या जेवणासाठी मी स्विटकाॅर्नचे भरपूर दाणे घालून पुलाव बनवला होता. खूपच मस्त टेस्टी झाला होता. कोणताही पुलाव असो तो गरमागरम खाण्याची मजा काही औरच असते. त्यावर साजूक तुपाची धार आणि हवेतर सोबत दही, पापड, लोणचं असेल तर पर्वणीच असते. आज मी स्विटकाॅर्न पुलावची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ३०० ग्रॅम तांदूळ
  2. 2 वाट्यास्विटकाॅर्नचे दाणे
  3. 2कांदे
  4. 1मोठा टोमॅटो
  5. 2बटाटे
  6. 2 टीस्पूनआलं-लसूण ठेचा
  7. 2 टीस्पूनतिखट पूड
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनमीठ
  10. 2 टीस्पूनधणे-जीरे पावडर
  11. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  12. 1 टीस्पूनगोडा मसाला
  13. 1/2 टीस्पूनसाखर (पाहिजे तर घालू शकता)
  14. 2 टीस्पूनतूप
  15. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    तांदूळ आणि स्विटकाॅर्न धुवून घेतले. कांदे आणि टोमॅटो बारीक चिरुन घेतले. बटाट्याच्या फोडी करुन घेतल्या. मिक्सर मधे आलं लसूणचा जाडसर ठेचा वाटून घेतला.

  2. 2

    कुकर मधे तेल घालून मग त्यात तूप घालावे म्हणजे तूप पटकन करपत नाही. नंतर त्यात फोडणी साठी जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परतला, मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून त्यात तिखट पूड, धणे-जीरे पावडर, गरम मसाला पावडर, गोडा मसाला, मीठ, साखर घालून चांगले परतले. त्यात स्विटकाॅर्नचे दाणे आणि बटाट्याच्या फोडी घालून मिक्स केले.

  3. 3

    मग त्यात धुतलेले तांदूळ घालून परतले. तांदळाच्या अडीच पटीने पाणी घालून मिक्स केले. तीन वाट्या तांदूळासाठी सात वाट्या पाणी घातले. आणि दोन शिट्या काढून शिजवून घेतले.

  4. 4

    गरमागरम स्विटकाॅर्न पुलाव सर्व्हिग प्लेट मधे घालून त्यावर साजूक तूप घातले, बरोबर काकडीच्या चकत्या आणि पापड ठेवून स्विटकाॅर्न पुलाव सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes