सत्तू पिठाची चटपटीत हारी लस्सी (sattu pithache hari lassi recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#उत्तर
#यूपीवबिहार
#हारीलस्सी
#सत्तूपिठाचेशरबत
सकाळची न्याहारी सातू पीठ 🥛🍚
सत्तू यूपी व बिहार मध्ये खूप प्रसिद्ध आहे. पण सत्तू पिठाच्या गुणांचा हाहाकार देशातल्या पुष्कळ राज्यांमध्ये आहे तसेच महाराष्ट्रातील विदर्भात सत्तू पिठाला खूप महत्व आहे. सत्तूला लोक पुष्कळ प्रकारे खातात . कोणी याचे शरबत बनवून पितात किंवा ह्या पिठाचे गोड स्वादिष्ट पदार्थ बनवून खातात.जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.

भाजलेल्या चण्याचे, किंवा ज्याला आपण डाळे/ फुटाणे म्हणतो त्याचे पीठ म्हणजे सत्तू. आपल्या आहारामध्ये सत्तूचा समावेश आपण केला तर तो आपल्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरू शकतो. सत्तूचे पीठ अगदी कडक उन्हाळा जिथे जाणवतो अश्या प्रदेशांमध्ये जास्त वापरले जाते.दिवसाची सुरुवात करताना सकाळच्या न्याहारीमध्ये सत्तू घेतल्यास त्यामध्ये असलेली पोषक तत्वे शरीराला दिवसभराच्या कामांसाठी भरपूर ताकद देतात.

सत्तू पीठ करण्याचे साहित्य व कृती :
४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून, १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर, गूळ टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात.तर चला मग आज यूपी व बिहारची सत्तू पिठाची प्रसिद्ध हारी लस्सी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ ते १० मिनिट
  1. साहित्य :
  2. 2 टीस्पूनसत्तू पीठ
  3. 2 टीस्पूनलिंबू रस
  4. 1ते २ टिस्पून चाट मसाला
  5. 1 चिमूटभरजीरा पावडर
  6. 1 चिमूटभरमिरे पावडर
  7. 1 टीस्पूनकांदा बारीक चिरलेला
  8. 1/२ हिरवी मिरची बारीक कापलेली
  9. चवीनुसारकाळे मीठ

कुकिंग सूचना

५ ते १० मिनिट
  1. 1

    स्टेप 1: दोन लहान चमचे सत्तूचे पीठ एका बाउल मध्ये घ्या घेऊनत्यामध्ये दीड ते 2 कप थंड पाणी घोळ बनवावा जास्त घट्ट पण नको किंवा पातळ पण नको

  2. 2

    स्टेप २: त्यांनतर त्यामध्ये चवीनुसार जीरे पूड,मिरे पूड,चाट मसाला किंवा लिंबू रस,हिरवी मिरची,बारीक कापलेला कांदा व काळे मीठ टाकून हे शरबत चांगल्या प्रकारे मिक्स करावे.

  3. 3

    स्टेप ३: तयार आहे आपली यूपी व बिहारची सत्तू पिठाची प्रसिद्ध हारी लस्सी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes