धिरडे (dhirde recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#GA4 #week12
#बेसन

बेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात.

धिरडे (dhirde recipe in marathi)

#GA4 #week12
#बेसन

बेसन हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे. या पिठात साधारण 15 धिरडे होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 ते 45 मिनिटे
15 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ पीठ
  2. 1/2 कपबेसन
  3. 1/4 कपरवा बारीक
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/4 टीस्पूनहिंग
  8. पाणी आवश्यकतेनुसार
  9. 2 ते 3 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

40 ते 45 मिनिटे
  1. 1

    तांदूळ पीठ, बेसन, रवा मोजून घ्या. आता त्यात मीठ, तिखट, हळद, हिंग घालून घ्या.

  2. 2

    सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करावे. थोडे थोडे करून पाणी घाला व पीठ, गुठळ्या होऊ न देता नीट मिक्स करा. व गरजे नुसार पाणी घालून पिठाची कनसिस्टंसी ठेवावी. व पीठ 10 मिनिटे झाकून ठेवा, म्हणजे रवा भिजेल.

  3. 3

    डोश्या प्रमाणे तव्यावर पीठ पसरवून घालावे. डोसा पेक्षा थोडे जाड घाला. व तेल लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजावे. जाळी पण खूप छान पडते, गरम गरम खूप छान लागतात. या बरोबर सॉस, चटणी बरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes