आंबा वडी रोल (amba vadi roll recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#cookPadTurns4 #cookwithfriut आंबा हा फळांचा राजा आंब्याचा सिजन३-४ महिनेच असतो त्या काळात आपल्याला मनसोक्त आंब्याच्या रेसिपी करून खाता येतात शिवाय वर्षभर आंब्याच्या फोडी किंवा रस करून फ्रिजर मध्ये स्टोअर करून ठेवता येतो अशा स्टोअर केलेल्या आंबाफोडी पासुनच आज मी आंबा वडी रोल बनवला आहे चला तर तुम्हाला हा पदार्थ कसा बनवला ते दाखवते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ ते १ तास
३-४ व्यक्तिसाठी
  1. ५०० ग्रॅम हापुस आंब्याचा पल्प
  2. २५० ग्रॅम साखर (साखर कमी जास्त करू शकतो)
  3. 1-2 टीस्पून वेलची पावडर
  4. 2 टीस्पून तुप किंवा तेल

कुकिंग सूचना

१/२ ते १ तास
  1. 1

    आंब्याच्या साली काढुन फोडी करून मिक्सर जार मध्ये फोडी व साखर वेलची टाकुन स्मुथ पेस्ट करून घ्या मोठ्या कढईत पेस्ट टाकुन चमच्याने सतत परतत रहा.

  2. 2

    ' सतत परतत राहिल्या ने आंबरस घट्ट होत जाईल.

  3. 3

    घट्ट आंबरस स्टिलच्या ताटाला तुप किंवा तेलाचा हात लावुन त्यात पसरवा व ही ताटे कडक उन्हात २-३ दिवस ठेवावीत नंतर सुरीने आंबा पोळी सोडवुन उलटी करून वाळवावी.

  4. 4

    आंबा पोळी वाळल्यावर आपल्याला हवे तसे सुरीने पिस करावे चौकोनी किंवा लांबट पट्टया कापुन रोल करावे.

  5. 5

    आपली आंबावडी व रोल रेडी डिश मध्ये सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद प्रांजल, शिल्पा ताई

Similar Recipes