रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Trupti Mungekar
Trupti Mungekar @cook_27575725

#स्नॅक्स
#गुरुवार_रवा ढोकळा
#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर
घरात सर्वांचा आवडता असा खूप टेस्टी आणि झटपट.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

35 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपजाड रवा
  2. 1/4 कपदही
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 3मिरच्या
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  7. चिमूटभरहिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 टीस्पूनमोहरी
  10. 5-6कडीपत्त्याची पाने

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये रवा आणि फेटलेले दही मिक्स करुन घ्यावे. नंतर त्यात लिंबाचा रस, 1 बारीक चिरलेल्या मिरची, हळद, एक टेबलस्पून तेल आणि मीठ टाकून चांगल मिक्स करा. मिश्रण थोडं घट्ट झालं असेल त्यात गरजे एवढे पाणी टाकून मिक्स करुन 15 मिनिट बाजूला ठेवून द्या.

  2. 2

    एक कढई मध्ये एक ग्लास पाणी उकळत ठेवा.15 मिनिटांनी रवा चांगला फुलला असेल, त्यात इनो फ्रुट सॉल्ट नाहीतर खायचा सोडा 1/2 टीस्पून टाका आणि ते ऍक्टिव्ह करण्यासाठी थोडेसे थेंब भर पाणी टाकून मिश्रण मिक्स करुन घ्या.

  3. 3

    एक केक टिन घ्या नसल्यास कुकर चा डबा घेतला तरी चालेल. त्याला आतून तेल लावून घ्या. आणि मिश्रण त्या मध्ये ओतून घ्या. कढई मध्ये पाणी उकळला असेल त्यामध्ये स्टॅन्ड ठेवून त्यावर हा टिन ठेवून घ्या. आणि 20 मिनिट मध्य आचेवर ठेवा.

  4. 4

    आता तडक्यासाठी एका छोटं भांड गॅसवर ठेवून त्यात तेल ओतून घ्या तेल गरम झालं कि त्यात मोहरी हिंग मिरच्या कडीपत्ता ची फोडणी तयार करा.

  5. 5

    20मिनिटांनी कढई वरून झाकण काढून एक टूथपिक किंवा सूरी ने ढोकळा तयार झाला का बघा. टूथ पिक ला मिश्रण लागला तर समजा अजून शिजायचं बाकी आहे. नाही लागला तर ढोकळा तयार आहे. गॅस बंद करुन थंड होऊ द्या. थंड झाल्यावर साईड ने सूरी ने ढोकळा मोकळा करुन घ्या. त्यावर तडक्याच मिश्रण घालून पिसेस करुन सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

यांनी लिहिलेले

Trupti Mungekar
Trupti Mungekar @cook_27575725
रोजी

Similar Recipes