बनाना चिप्स (banana chips recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#दक्षिण
केळाचे चिप्स हे सर्वत्र मिळतात.. नारळ आणी केळी हे कोकण आणी दक्षिण भारत इथे जास्त पिक असते. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू,केरळ इथे गेले की खोबरा तेलात तळलेले हे बनाना चिप्स हमखास मिळतात... आम्ही लाहन असतांना आई NCC कम्प मुळे दक्षिण भारतात गेली की ती हे चिप्स आठवणीनी आणायची तेव्हा आमच्या कडे हे मिळत नव्हते. आत्ता हे सगळी कडे मिळू लागलेत महाराष्ट्रात पण जळगाव, कोकण मधे बनतात पण सर्वांचे रंग, रूप,चव, वेग वेगळे आहेत..
दक्षिण भारत ही थीम मिळाल्यावर ही साधी सरळ आवडती रेसिपी आठवली..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

30 मिनट
85 ग्रॅम
  1. 4कच्ची केळी
  2. 500 ग्रॅमपाणी
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 500 ग्रॅमतेल (खोबरा/फल्ली)

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम एका पसरट भांड्यात पाणी घेउन त्यात हळद टाकून चांगले मिसळून घ्या. अर्धा वाटी पाण्यात मीठ विरघळून घ्या.

  2. 2

    मी इथे केळी सोल्णीने सोलून घेतलीत आतील पांढरा भाग दिसे पर्यंत. मग मी सोललेली केळी हळदीचया पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवली मग पुसुन त्याचे चिप्स पाडून घ्या. मला हळदीचा गड्ध रंग हवा होता म्हणून मी आधी चिप्स पाडून घेउन मग हळदीचया पाण्यात भिजत ठेवले व निथळून कपड्यावर पसरवून घेतले नाही वळले तरी चालेल. कढईत तेल घेउन हाय फ्लेम वर गरम करण्यास ठेवा.

  3. 3

    तेल हाय फ्लेम वरच ठेऊन चिप्स तळून घ्या तळातील बुडबुडे कमी झाले की मीठ विर्घळेले पाणी पाव चमचा कडेनि सोडा तडतडून तेल उडेल जरा संभाळून करावे तड्तडणे शांत झाले की चिप्स चा कडक वाटायला लागेल.

  4. 4

    तर तेव्हा हे चिप्स काढुन घ्या.व टिशू पेपर वर पसरवून ठेवा व थंडे होऊ द्या. व गरम चहा सोबत सर्व्ह करावे हे घरी बनवलेले बनाना चिप्स.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes