पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी

पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#ढाबा स्टाईल पनीर मसाला रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामपनीर
  2. 2मोठे कांदे
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनबटर
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनलालतिखट (चवीनुसार घेणे)
  7. 1 टेबलस्पूनबेसन पीठ
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  10. 2 टीस्पूनकसुरी मेथी
  11. 1 इंचआले
  12. 5-6लसुण पाकळ्या
  13. कोथिंबीर
  14. चवीनुसारमीठ
  15. आवश्यकतेनुसार पाणी
  16. 1तमालपत्र
  17. 1मसाला वेलची
  18. 1 तुकडादालचिनी
  19. 1चक्रफुल
  20. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम कांदे एकदम बारीक चिरून घेणे. टोमॅटो ची पेस्ट करून घेणे. आले लसूण पेस्ट तयार करणे. पनीर चे आपल्या आवडीनुसार तुकडे करून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात बटर आणि तेल घालून घेणे. (आवडत असल्यास फक्त बटर ही भाजीसाठी घालू शकता) गरम झाले कि त्यात तमालपत्र, वेलची, दालचिनी तुकडा, चक्रफुल घालून 2 मिनिटे परतून घेणे. आता त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर 5 मिनिटे छान परतून घेणे. व त्यातच आले लसुण पेस्ट घालावी.

  3. 3

    कांदा चांगला मध्यम आचेवर त्यात सोनेरी होऊ देणे. आता त्यात टोमॅटो पेस्ट घालून 5-7 मिनिटे चागले परतून घेणे.कांदा टोमॅटो छान परतला कि कढई मध्येच तो एका बाजूला घेऊन त्यातच बेसन पीठ घालावे व 1 चमचा तेल घालून ते बेसन पीठ रंग बदले पर्यंत भाजून घेणे.(बेसन पीठ मुळे भाजीला बाइंडिंग खूप छान येते.)

  4. 4

    आता या मध्ये सगळे मसाले घालून घेणे. व ते सगळे मसाले छान परतून घेणे. व त्या मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावे. खूप पाणी घालू नये. ही ग्रेव्ही थोडी घट्ट असते.

  5. 5

    या मध्ये वरून हाताने बारीक करून कसुरी मेथी घालावी. याने टेस्ट खूप छान येते.5 मिनिटे ग्रेव्ही उकळून घेणे. आता त्या मध्ये पनीर चे तुकडे घालावेत. व झाकण ठेवून ते 5 मिनिटे शिजवून घेणे. (पनीर जास्त वेळ शिजवू नये. ते रबरासारखे होते) गॅस बंद करावा. व वरून कोथिंबीर घालावी.

  6. 6

    अशाप्रकारे मस्त ढाबा स्टाईल झटपट होणारा पनीर मसाला तयार झाला. गरम गरम फुलके, पोळी किंवा राईस सोबत सर्व्ह करावे.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes