लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #week17
की वर्ड 'Moctail '
#लेमन -मिंट मोकटेल
#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल
झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात.

लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)

#GA4 #week17
की वर्ड 'Moctail '
#लेमन -मिंट मोकटेल
#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल
झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. लेमन -मिंट मोकटेल साठी साहित्य
  2. 3-4लिंबू तुकडे
  3. 7-8पुदिन्याची पाने
  4. 1 टीस्पूनपिठी साखर चवीनुसार घेणे
  5. 1 कपस्प्राईट / सोडा
  6. 4-5बर्फचे तुकडे किंवा क्रश
  7. 1 टीस्पूनलिंबू रस
  8. चवीनुसारमीठ
  9. लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल साठी साहित्य..
  10. 1 टीस्पूनलिंबू रस
  11. 7-8पुदिन्याची पाने
  12. 1 टेबलस्पूनस्ट्राबेरी सिरप
  13. 1 टीस्पूनपिठी साखर (ऑपशनल)
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 कपस्प्राईट /सोडा
  16. 4-5बरफाचे तुकडे किंवा क्रश

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम लेमन -मिंट मोकटेल पाहुयात...... लिंबाचे 3-4 छोटे तुकडे करून घेणे. पुदिन्याची पाने काढून घेणे. लिंबू रस काढून घेणे.

  2. 2

    छोटा खल बत्ता घेऊन त्यात लिंबू तुकडे आणि पुदिना पाने घालून ठेचून घेणे. आता एक काचेचा ग्लास घेऊन त्या मध्ये हे ठेचून घेतलेला लिंबू आणि पुदिना घालणे. आता त्या मध्ये साखर, लिंबू रस, किंचित मीठ घालणे.

  3. 3

    आता त्या मध्ये बर्फचे तुकडे किंवा क्रश करून घालणे.आणि वरून स्प्राईट घालावे. थोडे हलवून थंड थंड चिल्ल्ड सर्व्ह करावे. सर्व्ह करताना वरून लिंबू आणि पुदिना पाने ठेवून देणे. अशाप्रकारे झटपट होणारे मस्त लेमन -मिंट मोकटेल तयार.

  4. 4

    अशाचप्रकारे लेमन -मिंट स्ट्राबेरी मोकटेल तयार केले जाते. साहित्य तेच आहे. त्या साठी पुदिना पाने खल बत्ता मध्ये थोडे क्रश करून घेणे. तो पुदिना एका ग्लास मध्ये घालणे. आता त्या मध्ये लिंबू रस, पिठी साखर आणि मीठ घालून घेणे.

  5. 5

    आता त्या मध्ये स्ट्राबेरी सिरप आणि बरफाचे तुकडे किंवा क्रश बर्फ घालावा. आणि वरून स्प्राईट घालून थंड थंड सर्व्ह करावे.

  6. 6

    खूप छान लिंबू, पुदिना आणि स्ट्राबेरी ची टेस्ट त्या मध्ये लागते.

  7. 7

    अशाप्रकारे एकाच साहित्य मध्ये 2 वेगवेगळे मोकटेल तयार झाले.दोनीही मोकटेल चा आस्वाद घेऊयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes