मेथी_चमन (methi chaman recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#week19
#मेथी हा कीवर्ड घेऊन ही खास रेसिपी सादर करत आहे.

मेथी_चमन ही खास काश्मिरी डिश आहे. इथे पनीरला चमन म्हणतात. चमन म्हणजे स्वर्ग. आणि इथे पनीर खरोखर इतकं मऊ, मुलायम आणि लुसलुशीत मिळतं ना, की ते खाल्ल्यावर स्वर्गीय काहीतरी चाखल्याचा आनंद मिळतो. अगदी समर्पक नाव आहे.

अश्या मस्त स्वर्गीय चवीच्या चमन बरोबर मेथी म्हणजे अगदी सुपर्ब काँबिनेशन. तुम्ही नक्की करून बघा. ह्यात दोन्ही चवीचा स्वर्गीय मिलाफ होतो. तसंच दोन्ही पदार्थातून मिळणारे फायदे आरोग्यदृष्ट्या अतिशय लाभदायी आहेत.

मुख्य म्हणजे मेथी मधून anemia वर मात करणारे लोह हे खनिज, जे आपल्या केसांची वाढ, मजबूती तसंच काळेपणा, दाटपणा यासाठी आवश्यक आहे, ते भरपूर मिळते. एवढंच नव्हे तर दृष्टीसाठी सुध्दा खूपच आवश्यक असणारे व्हिटॅमिन A मेथी मध्ये मुबलक प्रमाणात असते.

करायला सोपी, चवीला भन्नाट आणि फायदेच फायदे देणारी मेथी_चमन नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३ व्यक्ती
  1. 1/2जुडी मेथी (इथे ती २५० ग्रॅम मध्ये घ्यावी लागते)
  2. २५० ग्रॅम चमन/पनीर
  3. 1 लहानकांदा
  4. 1/2 चमचाआले पेस्ट
  5. 1/4 चमचाहळद
  6. 1/2 चमचाकाश्मिरी तिखट
  7. 1/4 चमचाबडीशेप पूड
  8. तुकडा१" दालचिनीचा
  9. 1मसाला वेलची
  10. 1/4 चमचाधणेपूड
  11. 1/2 चमचाजीरे
  12. मीठ चवीनुसार
  13. 1 मोठा चमचामोहरीचे तेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्या. मोहरीचे तेल तापले आणि त्याचा धूर निघून गेला की त्यात जीरे, मसाला वेलची आणि दालचिनी घाला. मग कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत परता.

  2. 2

    आता त्यात धणेपूड, हळद, तिखट, आले पेस्ट आणि बडीशेप पूड घालून २ मिनिटे परतून घ्या. त्यात १ चमचा पाणी शिंपडा, म्हणजे खमंग वास येईल. मग त्यात मेथी घालून १ वाफ आणा.

  3. 3

    आता पनीर घालून मिक्स करा आणि १ वाफ आली की मीठ घालून पुन्हा १ वाफ द्या.

  4. 4

    तयार आहे मस्तपैकी मेथी_चमन. फुलका किंवा पोळीबरोबर छान लागते पण नान/कुलचा/तंदूर रोटी बरोबर जास्त छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes