मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#ब्रेकफास्ट
#मेथी_पराठा
मेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#मेथी_पराठा
मेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 3 कपगव्हाचे पीठ,
  2. 2 कपमेथी,
  3. 1/2 कपदही,
  4. 1कांदा,
  5. 4/5हिरव्या मिरच्या,
  6. 7/8लसणाच्या पाकळ्या,
  7. 1 टीस्पूनतीळ,
  8. 1 टीस्पूनधने पावडर,
  9. 1/2 टीस्पूनजीरे पावडर,
  10. 1/2 टीस्पूनलाल तिखट,
  11. 1/4 चमचाहळद,
  12. 1/2 टीस्पूनओवा,
  13. चवीनुसारमीठ,
  14. 1 टेबलस्पूनतेल,
  15. तूप किंवा बटर वरून लावण्यासाठी.

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    एका परातीत किंवा मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या. मेथी स्वच्छ धुवून निथळत ठेवावी. दही घ्यावे.

  2. 2

    कांदा, मिरची, लसूण मिक्सरमध्ये किंवा चाॅपरमध्ये बारीक करून घ्यावे.

  3. 3

    एका ताटात सर्व मसाले घ्या, मीठ घ्या.वाटीत तेल घ्या.

  4. 4

    आता पिठामध्ये मसाले, कांदा, दही घालून मिक्स करावे त्यात मेथी घालून हाताने चांगले एकजीव करून पीठ मळुन घ्यावे. गरजेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून मळावे. वरून तेल घालून मळुन दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  5. 5

    आता छोटे गोळे करून घ्यावे. गोळा पिठामध्ये घोळवून चपातीप्रमाणे गोलाकार लाटून घ्यावे.

  6. 6

    तवा गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूने ऊलटपालट करून भाजून घ्यावा. वरून तेल, तूप, बटर जे हवे ते लावावे. दही, चटणी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes