वॉलनट सिझलर ब्राउनी (walnut sizzler brownie recipe in marathi)

Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
इंडिया

#Walnuts
फायबर आणि मिनरल्स ने भरपूर असे अक्रोड म्हणजे Walnut हे तब्येतीसाठी तसेच आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त असं आहे. अक्रोड मध्ये omega-३, विटामिन ई आणि बी २ आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही फायदेशीर आहे.मी आज करतेय वॉलनट सिझलर ब्राउनी . यात आपण गव्हाचे पीठ वापरलेले आहे आणि साखर सुद्धा ब्राउन वापरलेली आहे. तर नक्कीच हि हेल्दी अशी Walnuts नी भरपूर हि ब्राउनी नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-४५ मिनिटे
४-५
  1. 1/4 कपबारीक चिरलेला अखरोट
  2. 3/4 कपदूध
  3. 1/4 कपमेल्टेड बटर
  4. 3/4 कपपावडर शुगर (ब्राउन)
  5. 1 टीस्पूनव्हॅनिला
  6. 1 कपगव्हाचे पीठ
  7. 1/4 कपकोकाआ पावडर
  8. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  9. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  10. २- ३ टेबलस्पून दूध (लागल्यास)

कुकिंग सूचना

४०-४५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम साखर आणि बटर छान फेटून (३-४ मिनिटे) मिक्स करावे, त्यात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घालून मिक्स करा.

  2. 2

    नंतर त्यावर गाळणी ठेवून गव्हाचे पीठ, कोकाआ पावडर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून गाळून घेणे. अखरोट चे तुकडे १ टीस्पून गव्हाच्या पीठाने कोट करावेत. आणि बॅटर मध्ये मिक्स करावेत. दूध घालत याचे बॅटर तयार करावे. लागल्यास २-३ टेबलस्पून दूध घालून नीट बॅटर तयार करावे.

  3. 3

    एकी कडे ओव्हन ३५० फ / १८० डिग्री ला प्रीहीट करावे.

  4. 4

    १८० डिग्री ला २५ मिनिटे हि ब्राऊनी बेक करावी.

  5. 5

    तयार ब्राउनी थंड झाल्यास कापून गरम सिझलर च्या प्लेट वर ठेवावी आणि त्या वर आईस क्रीम ठेवावी आणि वरून चॉकोलेट सॉस घालून हि ब्राउनी एन्जॉय करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monal Bhoyar
Monal Bhoyar @Monal_21524742
रोजी
इंडिया

टिप्पण्या

Similar Recipes