मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)

Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
Amravati

#GA4
#week20
#thepla
गुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो

मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)

#GA4
#week20
#thepla
गुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिन.
२ व्यक्ती
  1. 1 (1/2 कप)गव्हाचे पीठ
  2. 1/2 कपबारीक चिरलेली मेथी
  3. 3 टेबलसपूनचिरलेली कोथिंबीर
  4. 1 टेबलस्पूनदही
  5. 1 टीस्पूनआद्रक लसुन पेस्ट
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनधने पूड
  9. 2 टीस्पूनतेल + तळण्यासाठी तेल
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. मीठ स्वादानुसार
  12. पाणी

कुकिंग सूचना

३० मिन.
  1. 1

    एका परातीत एक कप गव्हाचे पीठ बारीक चिरलेली मेथी कोथिंबीर दही लाल तिखट धने पूड हळद अद्रक लसूण पेस्ट एक टीस्पून तेल चवीनुसार मीठ सर्व व्यवस्थित मिसळा

  2. 2

    गरजेप्रमाणे पाणी टाका व नरम, पोळी प्रमाणे पीठ मळून घ्या.१टीस्पून तेल गोळ्याला लावून, कापडाने पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा. पंधरा वीस मिनिटानंतर पिठाचे बरोबर सात गोळे बनवा

  3. 3

    एका प्लेटमध्ये अर्धा कप गव्हाच पीठ घ्या. एक गोळा घ्या व दोन्ही हाताने दाबून पोळपाटावर ठेपला बनवा

  4. 4

    तवा मध्यम आचेवर गरम करा व गरम तव्यावर कच्चा मेथीचा ठेपला टाका जेव्हा त्यावर छोटे-छोटे फोफे दिसतील तेव्हा ठेपला परतवा व त्यावर हाफ टीस्पून तेल पसरवा व 30 सेकंड पर्यंत शिजवा

  5. 5

    ठेपला परत पलटवा व त्यावर हाफ टीस्पून तेल पसरवा व दुसरी बाजू शिजवा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवा. शिजवताना जरूरति प्रमाणे आच कमी जास्त करा. तयार ठेपला दही किंवा चहा सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangala Bhamburkar
Mangala Bhamburkar @cook_26659112
रोजी
Amravati

टिप्पण्या

Similar Recipes