"झारखंड फेमस नाष्टा धुस्का" (duskha recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#पुर्व
#झारखंड_धुस्का

धुस्का या नावाचे मला थोडेसे कुतुहल निर्माण झाले.. म्हटलं आपण करायचाच हा पदार्थ..
कोणी नाही खाल्ले तर मी दोन दिवस खाईल..
पण शिल्लक राहातो होय.. मस्त खमंग आणि खुसखुशीत आणि त्याच्यासोबत बटाट्याची रस्सा भाजी..बेत मस्त जामलाच...
मुलगा म्हणे आई आज तुझी किचनची स्वारी बिहार झारखंड ला पोहचली.. म्हटलं हो रे ते पुर्व चालू आहे ना...
तो म्हणे इथुन मागे तर मी असं कधी ऐकले नाही पुर्व आहे आणि हे बनवले पाहिजे...
म्हटलं अरे बाबा हा काही सण किंवा शास्त्र असं नाही... Cookpad India समुहा वर पुर्व भारत च्या रेसिपीज चालू आहेत...
खुप हास्यासन झाले आमचे..😂😂
चला तर आपण या धुस्क्याची रेसिपी बघुया..

"झारखंड फेमस नाष्टा धुस्का" (duskha recipe in marathi)

#पुर्व
#झारखंड_धुस्का

धुस्का या नावाचे मला थोडेसे कुतुहल निर्माण झाले.. म्हटलं आपण करायचाच हा पदार्थ..
कोणी नाही खाल्ले तर मी दोन दिवस खाईल..
पण शिल्लक राहातो होय.. मस्त खमंग आणि खुसखुशीत आणि त्याच्यासोबत बटाट्याची रस्सा भाजी..बेत मस्त जामलाच...
मुलगा म्हणे आई आज तुझी किचनची स्वारी बिहार झारखंड ला पोहचली.. म्हटलं हो रे ते पुर्व चालू आहे ना...
तो म्हणे इथुन मागे तर मी असं कधी ऐकले नाही पुर्व आहे आणि हे बनवले पाहिजे...
म्हटलं अरे बाबा हा काही सण किंवा शास्त्र असं नाही... Cookpad India समुहा वर पुर्व भारत च्या रेसिपीज चालू आहेत...
खुप हास्यासन झाले आमचे..😂😂
चला तर आपण या धुस्क्याची रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
पाच
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 1/4 कपचना डाळ
  3. 3 टेबलस्पूनउडीद डाळ
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1/4 टीस्पूनहिंग
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टीस्पूनधनेपूड
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  10. 1/4 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  11. चवीनुसारमीठ
  12. तळण्यासाठी तेल
  13. 4हिरव्या मिरच्या
  14. बटाटा रस्सा बनवण्यासाठी
  15. 2बटाटे
  16. 2कांदे
  17. 2टाॅमेटो
  18. आले, लसूण पेस्ट
  19. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  20. 1 टेबलस्पूनधनेपूड
  21. 1/2 टीस्पूनहळद
  22. 1/4 टीस्पूनहिंग
  23. 1/4 टीस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम तांदूळ,चना डाळ, उडीद डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्या व पाच तास भिजत ठेवा

  2. 2

    भिजवलेले तांदूळ, डाळ,
    हिरव्या मिरच्या,आले,मिक्सरमध्येे बारीक वाटून घ्या.. पाणी जास्त घालू नये.... माझ्या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून चार..तुमची तिखट मिरची असेल तर दोन च घालाव्यात

  3. 3

    वाटलेले मिश्रण एका वाटी मध्ये काढून घ्यावे व दोन तीन तास तसेच झाकून ठेवावे म्हणजे धुस्के चांगले फुगतात... दोन तासाने मिश्रण छान फुलते..

  4. 4

    धुस्का बनवण्या आधी बटाटा रस्सा भाजी करून घेऊया...बटाटे साल काढून स्वच्छ धुवून वाटी मध्ये पाणी टाकून त्यात मोठ्या आकाराचे कापून ठेवावे.. कांदे टाॅमेटो बारीक कापून घ्यावे..

  5. 5

    कढईत तेल घालून गरम झाले की त्यात मोहरी जीरे हिंग घालून कापलेला कांदा घालावा.. एक मिनीटभर परतवुन घ्यावे व टाॅमेटो घालून चांगले मिक्स करून घ्यावे.. सगळे मसाले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे.

  6. 6

    मसाल्याला तेल सुटले की त्यात बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्यावे व त्यात मीठ व पाणी घालून शिजवून घ्यावे..

  7. 7

    धुस्का बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून गरम करण्यासाठी ठेवावे व पीठामध्ये हळद, हिंग,लाल तिखट मीठ, धनेपूड,जिरेपूड घालून चांगले मिक्स करावे आणि चमच्याने सहज पडेल अशी कन्सस्टंटी पाणी घालून करून घ्यावी... पीठ घट्ट ही नको आणि खुप पातळही नको..

  8. 8

    तेल चांगले तापले की गॅस मिडीयम करून थोडेसे बॅटर घालून बघावे..ते जर फुलुन वर आले तर चमच्याने बॅटर कढईत सोडावे... सोडताना वेळ घालवू नये.. आणि हात हलवू नये..बॅटर एकाच ठिकाणी सोडावे ते आपोआप पसरते व पुरी सारखा आकार येतो..

  9. 9

    पुरी तळतो त्या पद्धतीने सगळे धुस्के तळून घ्यावेत..

  10. 10

    धुस्का तेलात सोडल्यावर झाऱ्याने वरच्या बाजूला तेल घालावे.. अनारसे तळतो त्या पद्धतीने..मगच धुस्के चांगले पुरी सारखे फुगतात..

  11. 11

    मी पहिल्यांदाच बनवले आहेत..पहिले दोन तीन धुस्के वाकडे तिकडे झाले होते.. एकदम दोन टाकले होते..😂
    धुस्के तळण्यासाठी पसरट भांडे, पॅन घ्यावा...गोल कढई असेल तर एकावेळी एकच धुस्का सोडावा..

  12. 12

    पण नंतर मात्र सगळे धुस्के छान गोलमटोर झाले आणि मस्त फुगले होते..

  13. 13

    तय्यार धुस्के बटाट्याच्या रस्स्या सोबत सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes