साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤

साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)

आज महाशिवरात्री उपवास म्हटलं की फराळाचे पदार्थ आलेचं🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कप साबुदाणा
  2. 1/2 कपशेंगदाणे
  3. 3-4हिरव्या मिरच्या
  4. 2उकडलेले बटाटे
  5. 2-3 टीस्पूनदही
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. तेल
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. आवडीनुसार लिंबु

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतले नंतर त्यात साबुदाणा वर पाणी टाकून दोन तीन तास भिजत ठेवले

  2. 2

    कढयीत चांगले लालसर होईपर्यंत मंद आचेवर शेंगदाणे भाजून घेतले.

  3. 3

    उकडलेले बटाटे सारुन सालं काढून घेतली, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या.

  4. 4

    नंतर भिजलेला साबुदाणा शेंगदाणे मिक्सर मधून बारीक करून घेतले त्यावर दही,मीठ,थोडी साखर टाकून मिक्स करून घेतले.

  5. 5

    कढयीत तेल गरम करून जीरे फोडणीला टाकून हिरव्या मिरच्या, लालसर झाल्यावर त्यात कापलेले उकडलेले बटाटे टाकून मिक्स करून घेतले

  6. 6

    नंतर त्यात साबुदाणा टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  7. 7

    साबुदाणा खिचडी तयार झाल्यावर दही सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes