चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#GA4 #week10
Cheese

चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)

#GA4 #week10
Cheese

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 5-6चीज क्यूब किंवा चीज स्लाईस
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1ब्रेड पॅकेट
  4. 5-6हिरव्या मिरच्या
  5. 5-6लसून पाकळ्या
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. 1 इंचआलं
  8. चवीनुसारमीठ
  9. 3 टेबलस्पूनबटर
  10. 1/2 वाटीसॉस
  11. 1/2 वाटीशेजवान चटणी
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनजीरे
  14. 1 टीस्पूनमोहरी

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम हिरवी मिरची,आलं,लसूण,कोथिंबीर याचे मिक्सर मध्ये बारीक वाटून पेस्ट तयार करावी. आता पॅनमध्ये तेल ऍड करुन गरम करा त्यामध्ये जीरे, मोहरी आणि तयार केलेले हे वाटण ॲड करा आणि एक मिनिट परतून घ्या.

  2. 2

    आत्ता उकडलेला बटाटा स्मॅश करुन घ्या. आणि फोडणी मध्ये ॲड करा चवी नुसार मीठ टाकून झाकण ठेवून दोन मिनिटे बटाटा वाफवून घ्या.

  3. 3

    आता सँडविच बनविण्यासाठी दोन ब्रेड स्लाइस घ्या दोन्ही ब्रेड स्लाईस वरती प्रथम सॉस लावून घ्या ऐका स्लाईस वरती बटाट्याचे मिश्रण लावा आणि दुसरा ब्रेड स्लाईस वरती शेजवान चटणी लावून घ्या.

  4. 4

    आता दोन्ही ब्रेड सलाइस वरती चीज किसून टाका मी चीज क्यूब चा वापर केलेला आहे. चीज स्लाईस असेल तर चीज स्लाईस ठेवा आता एक ब्रेड स्लाईस वर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा.

  5. 5

    आता एका तव्यावर ते थोडेसे बटर स्प्रेड करुन घ्या व तयार केलेले ब्रेड पोटॅटो सँडवीच भाजण्यासाठी तव्यावर ती ठेवा दोन्ही साईड ने स्लाईसला बटर लाऊन घ्या आणि छान खरपूस भाजून घ्या अशाप्रकारे सर्व सँडवीच तयार करुन घ्या.

  6. 6

    तव्यावर तेच सँडवीच कट करुन घ्या मस्त चीजी सँडविच सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर वरून चीज टाकून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes