लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#FD
ही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम.

लाटीव वडी (Latvian vadi recipe in marathi)

#FD
ही वडी माझ्या सासू अतिशय उत्कृष्ट बनवितात. त्यांच्याकडून मी शिकले. वडीचा हा प्रकार मला आणि घरातील सर्वांनाच आवडतॊ . त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही करून बघावी म्हणून हा प्रयत्न.. ही वडी लांबच्या प्रवासात घेऊन जायला अतिशय उत्तम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. सारण -
  2. 1-1/2 वाटी खिसलेले खोबरे,
  3. 1/2 वाटीकारळ्याचे कुट
  4. 2 लसूण, कांदे,
  5. 1 टीस्पूनकाळीमिरी,
  6. 1 इंचदालचिनी
  7. 1/2 टीस्पूनलवंग,
  8. 1 टेबलस्पून खसखस हे सर्व एकत्र वाटून घ्या
  9. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर,
  10. 1 टेबलस्पून मिरची ठेचा,
  11. 1-1/2 टेबलस्पून काळा मसाला,
  12. 3/4 टीस्पून मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करावे
  13. कव्हरसाठी -
  14. 2 वाटी बेसन,
  15. 1 वाटी गव्हाचेपीठ,
  16. 1-1/2 टीस्पून मिरची ठेचा,
  17. हळद, चवीनुसार मीठ, आवश्यक तेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन व गव्हाचे पीठ, हळद, मिरची ठेचा, चवीनुसार मीठ एकत्र करून पिठाचा घट्ट गोळा तयार करावा.

  2. 2

    मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचा गोळा करून पोळी लाटावी. त्या पोळीवर तयार सारण एकसारखे पसरवून त्याचा रोल करावा. जमत असेल तर त्या रोलला त्रिकोणाकार शेप दयावा व वड्या पाडाव्यात.

  3. 3

    हया वड्या दोन्ही बाजुनी बंद कराव्यात आणि चाळणीत वाफवून घ्याव्यात. थंड झाल्यावर तळून घ्याव्यात. अशाप्रकारे चटकदार वडी तयार! 😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

टिप्पण्या (3)

Similar Recipes