खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम.

खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)

गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30मिनिट
19-20गुलाबजाम
  1. 150 ग्रामताजा खवा
  2. 4-5 टेबलस्पूनमैदा
  3. 1-1/2 वाटीसाखर
  4. 3-4वेलची
  5. चिमटभर खायचा सोडा

कुकिंग सूचना

25-30मिनिट
  1. 1

    खवा, मैदा थोडी वेलची पूड आणि चिमटभराला सोडा घालून घ्या आणि चांगले मळून घ्यावे. मळताना त्यात दूध किंवा पाणी घालू नये.

  2. 2

    गुलाबजामचे प्रमाण योग्य आहे का हे पाहण्यासाठी सुरवातीला एक छोटा गोळा मध्यम गरम झालेल्या तेलात किंवा तूपात सोडून पहावा. गोळा जर विरघळला नाही तर प्रमाण योग्य आहे आणि गोळा विरघळत असेल तर त्यात आणखी थोडा मैदा घालून गोळे वळावे. गोळे तूपात सोडावेत.

  3. 3

    गोळे मध्यम आचेवर ठेवून हलवत हलवत सर्व बाजूंनी एकसारखे तळावेत. तळलेले गुलाबजाम पाकात घालण्या करिता पाक बनवावा.

  4. 4

    साखर पातेल्यात घ्या आणि ती बुडेल एवढे पाणी घालावे व विरघळून जाईपर्यंत सतत हलवावे. साखर विरघळून गेली की एक तीन चार मिनिटं तसेच हलवावे व नंतर गॅस बंद करावा. आता गरम पाकातच तळलेले गुलाबजाम भिजवावेत.

  5. 5

    सर्व गुलाबजाम एकसारखे भिजण्याकरिता पहिला टाकलेला घाना बाजूला काढावा आणि त्यात तळलेले गुलाबजाम भिजवावेत. म्हणजे सर्व गुलाबजाम भिजले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes