स्पेशल कोल्हापूरी झणझणीत चुलीवरचे मटण (mutton recipe in marathi)

Vaishali Dipak Patil
Vaishali Dipak Patil @vaishu

#KS2
“Variety is the Spice of Life!” नवीन नवीन अनुभव , आयुष्याची नागमोडी वळणे ,जीवन जगणे अतिशय रंजक बनवून टाकतात... याप्रमाणे खाद्य पदार्थ चे ही आहे... त्यात पण खुप साऱ्या variety. आता कोल्हापूर म्हंटले की तांबडा रस्सा आलाच तसाच काहीसा मी केलेला हा प्रयत्न कोल्हापुरी झणझणीत चुलीवरचे मटण (तांबडा रस्सा).

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50मी.
4 ते 5 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोमटण
  2. 3मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेला
  3. 15-20लसूण पाकळ्या
  4. 1 इंचआल्याचा तुकडा
  5. 2 टेबलस्पून लाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 3 टेबलस्पूनधने पावडर
  8. 1/2 चमचागरम मसाला
  9. 20-25खोबरे काप
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल आवश्यकतेनुसार
  12. 1 चमचाकोल्हापूरी मटण मसाला
  13. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  14. 1 चमचाजीरे
  15. कोथिंबीर बारीक चिरलेली

कुकिंग सूचना

50मी.
  1. 1

    सर्वप्रथम मटण छान धूवून घेऊ व त्याला आले लसूण पेस्ट लावून मॅरीनेट करुण घ्यावें. आता कापलेला कांदा छान भाजून घ्यावे.खोबरे काप ही भाजून घ्यावे आणि त्यात लसूण पाकळ्या, आले, धने पावडर गरम मसाला, खोबरे काप, लाल तिखट, इ. सर्व घालुन मसाला वाटून घ्यावा.

  2. 2

    आता चुलीवर एका कढईत तेल तापवून त्यात जीरे घालावे. आणि त्यात मटण घालावे व शिजू द्यावे. थोडी हळद घालावी नंतर पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे.30मि. मटण शिजायला थोडा वेळ लागतो. आता एका कढईत तूप गरम करून त्यात वाटलेला मसाला घालुन परतावे आणि मसाला छान शिजू द्यावा. कोल्हापुरी मटण मसाला घालावा.

  3. 3

    मसाला छान शिजून तयार झाला की त्यात शिजलेले मटण घालावे.

  4. 4

    चवीनुसार मीठ घालून उकडी येवू द्या, छान शिजू द्यावे. मस्त गरमा गरम कोल्हापुरी झणझणीत चुलीवरचे मटण तांबडा रस्सा तयार आहे... वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishali Dipak Patil
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes