अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)

#md #Mothers_Day_Recipe #अळूचं_फदफदं...
Happy Mother's Day to you all💐🌹#स्वामीतिन्हीजगाचाआईविनाभिकारी🏵️🙏
मातृदिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐💐
#आई या शब्दातच आपले सारे विश्व सामावलेले असते ना...#आ म्हणजे #आत्मा आणि #ई म्हणजे #ईश्वर.....असं म्हणतात की परमात्म्याने सर्वां बरोबर राहता यावे म्हणून आई निर्माण केलीये...अगदी बरोबर म्हटलयं नं..मातृदेवो भव🙏🙏आई म्हणजे जणू त्या विधात्याचे सगुण रुपच👩👧👦...सारी माया ममता इथूनच सुरू होऊन परत इथेच येऊन थांबते..#आई शब्दात सारं ब्रम्हांड सामावलं आहे म्हणून #आई या शब्दाचा अर्थ काढण्यास शब्दही कमी पडतील...तर अशा या शब्दांच्या महासागरातून #आई विषयी काही #शब्दमोती मी वेचायचा छोटा प्रयत्न केलाय...
सर्व मातृदेवतांना समर्पित🙏🙏🙏🙏
आई तूचि गुरु जीवनाचा तारु ,आणि असे तू कल्पतरू
आई तूचि लळा,जीविचा जिव्हाळा असे तू चैतन्याचा सोहळा
आई तूचि ज्ञानमाऊली,आभाळासम साऊली वसे तू देह राऊळी
आई तूचि मायेचा ओलावा,भावनांचा गोडवा,असे तू कुशीतील विसावा
आई तूचि मैत्रीचे बंध,ह्रदयाचे स्पंद ,असे तू रुधिर अन्् मेरुदंड
आई तूचि श्र्वास, प्रेमाची आस,असे तू अंतरीचा ध्यास
आई तूचि सह्याद्रीचा बाणा,सत्याच्या आणा ,असे तू कणखर कणा
आई तूचि पहिला शब्द,तू पहिली साद,असे तू अनंताची संगत
आई तूचि दीपस्तंभ,सुख दुःखाची साथ संगत, संस्कारांचा आकृतीबंध..आई माझी
आई तूचि वटवृक्ष ,खंबीर परी मायेची नाळ,सकल जनांचा आधार...आई माझी
आई तूचि सांग कसे फेडू मी पांग..वात्सल्याची उतराई कशी होऊ सांग....आssई माझी🙏🙏
©️भाग्यश्री लेले
आईच्या हातच्या अळूच्या पातळ भाजीला तोड नाही..मला प्रचंड आवडते तिच्या हातची भाजी..😋😋..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..
अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)
#md #Mothers_Day_Recipe #अळूचं_फदफदं...
Happy Mother's Day to you all💐🌹#स्वामीतिन्हीजगाचाआईविनाभिकारी🏵️🙏
मातृदिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा 💐💐
#आई या शब्दातच आपले सारे विश्व सामावलेले असते ना...#आ म्हणजे #आत्मा आणि #ई म्हणजे #ईश्वर.....असं म्हणतात की परमात्म्याने सर्वां बरोबर राहता यावे म्हणून आई निर्माण केलीये...अगदी बरोबर म्हटलयं नं..मातृदेवो भव🙏🙏आई म्हणजे जणू त्या विधात्याचे सगुण रुपच👩👧👦...सारी माया ममता इथूनच सुरू होऊन परत इथेच येऊन थांबते..#आई शब्दात सारं ब्रम्हांड सामावलं आहे म्हणून #आई या शब्दाचा अर्थ काढण्यास शब्दही कमी पडतील...तर अशा या शब्दांच्या महासागरातून #आई विषयी काही #शब्दमोती मी वेचायचा छोटा प्रयत्न केलाय...
सर्व मातृदेवतांना समर्पित🙏🙏🙏🙏
आई तूचि गुरु जीवनाचा तारु ,आणि असे तू कल्पतरू
आई तूचि लळा,जीविचा जिव्हाळा असे तू चैतन्याचा सोहळा
आई तूचि ज्ञानमाऊली,आभाळासम साऊली वसे तू देह राऊळी
आई तूचि मायेचा ओलावा,भावनांचा गोडवा,असे तू कुशीतील विसावा
आई तूचि मैत्रीचे बंध,ह्रदयाचे स्पंद ,असे तू रुधिर अन्् मेरुदंड
आई तूचि श्र्वास, प्रेमाची आस,असे तू अंतरीचा ध्यास
आई तूचि सह्याद्रीचा बाणा,सत्याच्या आणा ,असे तू कणखर कणा
आई तूचि पहिला शब्द,तू पहिली साद,असे तू अनंताची संगत
आई तूचि दीपस्तंभ,सुख दुःखाची साथ संगत, संस्कारांचा आकृतीबंध..आई माझी
आई तूचि वटवृक्ष ,खंबीर परी मायेची नाळ,सकल जनांचा आधार...आई माझी
आई तूचि सांग कसे फेडू मी पांग..वात्सल्याची उतराई कशी होऊ सांग....आssई माझी🙏🙏
©️भाग्यश्री लेले
आईच्या हातच्या अळूच्या पातळ भाजीला तोड नाही..मला प्रचंड आवडते तिच्या हातची भाजी..😋😋..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुऊन पाण्यात पाच ते सहा तास भिजत ठेवा त्याचबरोबर चिंच देखील पाण्यामध्ये भिजवून ठेवा.
- 2
आता अळू स्वच्छ धुऊन त्याची देठं काढून देठांवर ची सालं काढून पातळ कापून घ्या.त्याच पद्धतीने आळूची पाने देखील बारीक चिरून घ्या.आता ही देठं आणि पानं मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. तसेच एकीकडे चणाडाळ आणि शेंगदाणे भिजलेले आहेत ते देखील उकडून घ्या साधारण बोटचेपे झाले की गॅस बंद करा.
- 3
आता एका कढई मध्ये तेल घालून अळूची पेस्ट घालून परतून घ्या नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घाला मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे कढीपत्त्याची पाने,मुळा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि उकळी येऊ द्या.आता यामध्ये चिरलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करा. त्याचबरोबर खोबऱ्याचे काप आणि काजू देखील घाला..अळूच्या या भाजीला जे आपल्याला बेसन लावायचे आहे ते एका भांड्यात घेऊन त्यात थोडे पाणी घाला आणि त्याची पेस्ट करून घ्या.
- 4
आता वरील भाजीमध्ये तिखट, गोडा मसाला घालून भाजी व्यवस्थित मिक्स करा.आता यामध्ये चिंचेचा कोळ घाला आणि गूळ घाला. आणि भाजीला चांगल्या उकळी आणा. आता जे पण बेसन कालवलेले आहे पाण्यामध्ये ते या भाजीमध्ये हळूहळू घालून एकीकडे सतत भाजी ढवळत राहा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत बेसनामुळे अळूच्या भाजीला थोडा दाटपणा येतो. आता भाजीला अजून एक ते दोन उकळ्या काढा.
- 5
दुसरीकडे एका कढल्यात जरासे जास्त तेल घेउन तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि त्यात जीरे घाला,हिंग हळद,थोडा कडीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि मेथी दाणा घालून खमंग फोडणी करून घ्या.या भाजीला खमंग फोडणी ची आवश्यकता असते नाहीतर या भाजीची चव बिघडते. आता भाजी मध्ये कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून एक दोन उकळ्या आणा आणि गॅस बंद करा तयार झाले आपले आळूची पातळ भाजी किंवा अळूचं फदफदं..
- 6
तयार झालेले अळूची भाजी गरमागरम आंबेमोहोर तांदळाच्या भाताबरोबर आणि गरमा गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.
- 7
- 8
- 9
- 10
Similar Recipes
-
अळूचं फदफदं (alu fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाच्या आठवणी गावाचं नाव घेतलं कि लहानपणी च्या गावाच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात ..विशेष आठवते ते चुलीवर शिजवलेले जेवण. लहानपणी गावी साधं सात्विक जेवण बनवलं जायचं पण ते अतिशय रुचकर असायच. अळूचं फदफदं त्यापैकी च एक . साधी अळू च्या पानाची भाजी पण चुलीवर शिजवलेली ही भाजी आणि भाकरी म्हणजे अप्रतिम चव ..आता ही लग्नाच्या पंगतीत ही आंबट गोड तिखट चवीची भाजी अवश्य असते पण ती लहानपणी ची चव काही येत नाही . Shital shete -
पंचामृत(आंबट गोड चवीचे मिरची चे) (Panchamrut recipe in marathi)
#ट्रेडिग रेसिपी #या आठवड्यातील ट्रेडिग रेसिपी म्हणून ही केली आहे .पंचामृत म्हणजे तिखट,गोड, आंबट, खारट,कडु या सर्व स्वादाचे मिश्रण.तोंडी लावण्याचा उत्तम पदार्थ.जेवणाची डावी बाजू सजवणारा पदार्थ. Hema Wane -
कोहळ्याचे बोडं (kohlyache bodam recipe in marathi)
#md#jyotshanskitchen#वल्डमदर्सडे#आई माझा अनमोल दागिना#आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, 🙏#आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, 🙏#आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, 🙏#आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी , 🙏#मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐माझी आई सुगरण तर आहेच पण तिच्या हाताला चवही खूप आहे. मला आईच्या हातच्या सगळ्याच रेसिपी आवडतात तीच्या कडूनच मी बघुन बघुन अनेक रेसिपी शिकलेय. तिने बनवलेले सर्वच पदार्थ खूप आवडतात पण बोंडं आणि पुरणपोळी हे जास्त प्रिय आहे, म्हणून मी आज स्पेशल कोहळ्याचे बोंडे बनविले चला तर मग mother's Day रेसिपी बघूया ........ 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
मँगो कस्टर्ड संदेश (Mango Custard Sandesh Recipe In Marathi)
#MDR #मदर्स_डे_रेसिपीHappy Mother's Day💐🌹❤️🎉🎊 आपल्या सर्वांमधील मातृदेवतेला माझं वंदन🙏🌹🙏 *आई*माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणांसाठी तू स्वतःची कूस मायेनं बहाल केलीस....अन् तुझ्या धमन्यातील जीवनरसावर माझ्यात प्राण ओतून मला प्राणापलिकडे पोसलंस....अचानक एका क्षणी जीवघेण्या वेदनांनाआपणहून तू सामोरी गेलीस....आणि माझी भूमिका पार पाडण्यासाठी तू मला जगाच्या रंगभूमीवर entry करुन दिलीस...हर रोज जगण्यातली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी तू समरसतेने जगलीस...कधी वैशाख वणव्यात माझ्यासाठी तू सावली बनून राहिलीस...तर कधी भावनांची समीकरणं सोडवायला ओलाव्याची साथ दिलीस...जीवनपटावर माझं व्यक्तिशिल्प साकारुन मला ओळख मिळवून दिलीस...लेकरांसाठी आईपणाच्या खस्ता खात असतानाच तुझी पावले आता आधार शोधू लागलीत...अन् आता मी काय करु ..कसं करु विचारीत आमची बोटं तू निर्धास्तपणे पकडलीस...नेमक्या याच क्षणांत माझं बालपण मला फिरुन तुझ्यात अनुभवायला मिळतंय...मला पाहताच तुझे ते लकाकणारे डोळे पाहूनआता मीच खूप भरुन पावतीये....तुझ्यातील मी आणि माझ्यातील तू पाहून मीच प्रेमाने हरखून जातीये....आताशा तुझ्यात दिसणारर्या त्या निरागस मुलाशी मी वात्सल्याने खेळतीये....तुझ्याभोवतीच फिरणारं सगळं जग माझंहीच भावना तृप्त मला करतीये....सगळं काही भरभरुन देताना आईआणखी एक सुख तू माझ्या पदरात टाकलंस...*आईची आई* होण्याचं दान माझ्या पदरात टाकून सार्या जगात भाग्यवान मला केलंस..सार्या जगात भाग्यवान मला केलंस..🙏❤️🙏©®भाग्यश्री लेले आजच्या खास दिवसाची खास fusion रेसिपी... Mango Custard Sandesh..🍨🍨 Bhagyashree Lele -
अळूचं फदफदं - पारंपरिक सात्विक भाजी (alooch fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकभाजीच्या अळूची कोवळी पानं आणि देठ घालून ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची सात्विक भाजी कांदा लसूण न घालता केलेली. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नैवेद्याच्या पानात, लग्न समारंभाच्या भोजनात ही भाजी केली जाते. एवढ्या चविष्ट भाजीला असं विचित्र नाव का दिलंय माहित नाही. Sudha Kunkalienkar -
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल "अळूच फदफदं"श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे. लता धानापुने -
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
-
चुरमा लाडू (Churma Ladoo recipe in marathi)
#आईकिती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.स्वर्गातील तो काळ माझ्या भोवताली होता.एकटीच मी आणि माझं जग तू होतीस.या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती.तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.तुझा आवाज येताच ओठ माझे हसायचे.कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे.तू स्वत: ला कित्ती कित्ती जपायचीस.एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.गर्भातले ते महिने पून्हा येणार नाहीत.पण मी अजुनही तुझ्याशिवाय जगू शकणारच नाही....... - शिल्पा कुलकर्णी ज्योतीषाचा-याअजून काय सांगू मी माझ्या आईबद्दल......आई या दोन शब्दांची थोरवीच इतकी प्रचंड आहे की आपण देवाला सुद्धा आई, माऊली म्हणून हाक मारतो.अश्या या आईची आवडनिवड काही वेगळी नसतेच कधी...संपूर्ण घराची आवड तीच तिची आवड असते...ते ही न कुरकुरता न कुरबुरता,तिला तिच्यासाठी मी वेगळं काही करताना मी कधी पाहीलेच नाही....पण तरी सुद्धामला जाणवलेल्या तिच्या आवडीनिवडीमधील तिचा अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे "चुरमा लाडू".....माझी आई गुजराती.माझे वडील कोकणी.त्यामुळे आईला सगळेच पदार्थ मी आवडीने करताना आणि खाताना पाहिले आहे....पण तरी सुद्धा,सगळ्यात वर ज्या पदार्थाचा नंबर लागतो तो म्हणजे," चूरमा लाडू " च......चला तर पाहूगुजरातची आण, बाण, शान.....चूरमा लाडू चे साहित्य आणि कृती....🙏Anuja P Jaybhaye
-
कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)
#NVRअळूची पाने (Taro Leaf) हे पचनास खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. इतकच काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी या अळूच्या पानांची भाजी खूपच गुणकारी आहे.अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतातअळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.तर आपण आज अळूच्या पानाचे कोकणातील प्रसिद्ध असे अळूचं फदफद पाहू Sapna Sawaji -
पन्हे (Panhe recipe in marathi)
#summer special # पन्हे # उन्हाळ्यात कच्च्या आंब्याचे पन्हे, अगदी आवश्यकच... कधी ते गुळ घालून करतात. पण मी नेहमीच त्यात साखर टाकते. या दिवसात उन्ह लागल्यानंतर पन्हे पिण्यास दिले तर आराम वाटतो. असे हे घरोघरी होणारे पन्हे.. साधे सोपे, पण स्वादिष्ट ... Varsha Ingole Bele -
कोल्हापूरचे रावण पिठलं (kolhapuriche ravan pithla recipe in marathi)
#md #mother's Day recipe #रावण पिठलं..Happy Mother's Day 🥰🌹❤️ Happy Mother's Day to you all..😊💐 आई....आ...आत्मा आणि ई... ईश्वर यांचा वास *आई *या दोन शब्दात आहे.. परमात्म्याचा वास आईच्या रुपाने आपल्या ठायी अाहे..आई शब्दात सार्या जगाची ताकद सामावलीये..सगळी माया ,ममता,प्रेम तिच्यात सामावलंय..*आई *म्हणजे आपल्या आयुष्याला वळण लावणारं,अनुभवांची शिदोरी देणारं,खंबीरपणे आधार देणारं हस्तलिखितच जणू...त्यातील प्रत्येक पान दिशादर्शक,प्रत्येक पानावर जाणवणारी तिची आभाळमाया,घाबरु नकोस..मी आहे हा विश्वास , ज्ञान संस्काराची दिलेली आणि कायम पुरणारी शिदोरी..असे हे मानाचं सदैव हिरवेगार पान..हे पान सदैव ज्ञान,संस्कार,DNA च्या रुपात आपल्याबरोबर असतं..आंब्याच्या पानांचा रंग ते पान सुकलं तरी बदलत नाही..हिरवच राहातं तसंच आईचं प्रेम,माया कधीच आटत नाही..ते आपल्या जन्माच्या आधीपासून जसं असतं तसंच कायम राहतं..आईच्या नऊ नाड्यांची आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही..तर अशी ही वात्सल्याचा सिंधू म्हणजेच वात्सल्याचा सागर असलेली प्रत्येकाची आई..तिला कशाचीच तोड नाही..एकमेवाद्वितीय...!!!! आपली शीतल छाया...🥰.. सर्व मातृदेवतांना माझं नमन, 🙏🌹🙏माझ्या आईच्या हातचं पिठलं हा प्रकार माझ्या खूप आवडीचा..मग ते कुठलंही पिठलं असो..तव्यावरचं असो,झुणका असो,थोडं पातळसर गुठळ्यांचे असो..किंवा रावण पिठलं असो.. अप्रतिम चव..😋😋..चला तर मग आपण रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gur#शेपूची_भाजी..😋😋 गणपती आगमनानंतर दोन दिवसांनी ज्येष्ठा गौरींचे आगमन होते..ज्येष्ठा गौरींचे वाजतगाजत आगमन झाल्यावर त्या स्थानापन्न झाल्यावर त्यांची पूजा करुन त्यांना शेपूची भाजी ,भाकरीचा नैवेद्य दाखवतात..या सिझनमध्ये मिळणार्या ताज्या शेपूची चव काही औरच असते..म्हणून या माहेरवाशिणीसाठी मुद्दाम ह्या खमंग खरपूस शेपूच्या भाजीचा नैवेद्य दाखवतात..चला तर मग माझ्या अत्यंत आवडीच्या या भाजीची रेसिपी पाहू या.. Bhagyashree Lele -
-
आंबट गोड वरण (ambat god varan recipe in marathi)
#रेसिपीबुक#खाटी #week2 रेसिपी बुक या माझ्या सखीने सांगितलेल्या *गावाकडच्या आठवणी* या पुष्पातील दुसरी गोड आठवण ...माझ्या आजोळची..मामाच्या गावाची..मामाचा गाव हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय...माझं आजोळ *कडूस* पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक छोटंस, सुंदर गांव..मनाचा हळवा कोपराच..सुट्टया लागल्या की आम्ही चाललो मामाच्या गावाला..टुमदार वाडे, गल्लीबोळातले रस्ते, निसर्गरम्य परिसर, चहुबाजूंनी शेती, जिल्हा परिषदेची शाळा..सगळं काही उत्साहाला प्रेरित करणारं..आमच्या कडूसचे पंचक्रोशीतील प्रसिद्ध श्री पांडुरंग देवस्थान🙏...गेली ३७४ वर्ष येथे माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा हे सहा दिवस श्री पांडुरंगाचा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे.तुकाराम महाराजांनी या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.ते २८ वर्ष या उत्सवाला येत होते. दहा दिवसात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड आरती होत नाही..कारण तुकाराम महाराजांच्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पांडुरंग येथे विश्रांती घेतात..महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून पण भाविक दर्शनासाठी येतात ..त्यांच्यासाठी अन्नछत्र चालू आहे..हजारो भाविक पंगतीचा लाभ घेतात..अशा या उत्सव काळातील पंगतीतील एक अविभाज्य पदार्थ म्हणजे *खाटी*...अर्थात आंबट गोड वरण..ज्याची चव केवळ अलौकिकच...भात पोळी बरोबर खाल्ली जाते..*खट्टी* या शब्दाचा अपभ्रंश होऊन *खाटी* म्हणत असावेत..खाटी..खाटी..खाटी...असं म्हणत वाढायचं शास्त्र आहे ते...😄आणि पानात पडताच खाटी ओरपताना तिचे ओघोळ हातातल्या कोपरापर्यंत जावेच लागतात...चला तर मग सुरू करुया आजची रेसिपी...😊4..#खाटीअर्थात Bhagyashree Lele -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
अननस सासव किंवा अननस सासम.. (anasas sasav recipe in marathi)
#दक्षिण #कर्नाटक #दक्षिण भारत रेसिपीजमाझ्या एका GSB मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीला मी गेले होते.. त्या मुंजीच्या जेवणात मी पहिल्यांदा अननसाचे सासव खाल्ले. खूप रुचकर खमंग चटपटीत अशा चवीचे ते होते. म्हणूनच तिच्याकडे सहज मी चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की गोव्यापासून ते कर्नाटक राज्यातील उडपी, मेंगलोर ,कारवार या जिल्ह्यांमध्ये अननसाचे सासव प्रामुख्याने शाकाहारी जेवणात करतात. पण प्रामुख्याने उडुपी मंगलोरमध्येकरतात.गप्पांच्या ओघात उडुपी चं तेराव्या शतकात बांधलेलं श्रीकृष्ण मंदिर मठ आणि एक हजार वर्षांपूर्वी चे जुने भगवान शंकरांचे चंद्रमौलेश्वर मंदिर तसेच उडुपी रेस्टॉरन्ट मधील स्वादिष्ट व्यंजने आणि शिक्षणाची पंढरी मणिपाल , माल्पे चा अद्भुत नितळ बीच,सेंट मेरीज हे निसर्गाच्या सृष्टिसौंदर्याने नटलेले नितांत सुंदर शांत रम्य बेट ही सर्व बघण्यासाठी तू नक्कीच एकदा तिकडे भेट दे असेही आवर्जून सांगितले . मैत्रिणीने एक मजेदार कथा सांगितली ती अशी आपल्या 27 नक्षत्रांनी,तारृयांनी चंद्राबरोबर लग्न केलं होतं आणि त्यानंतर लगेच चंद्राचा आपला प्रकाश, आपली चमक लुप्त झाली. मग यावर उपाय म्हणून चंद्र आणि तारे यांनी भगवान शंकरांचे शिवलिंग तयार केले आणि त्याची पूजा केली .. ते चंद्रमौलेश्वर शिवलिंग.. संस्कृत मध्ये उडू चा अर्थ आकाशातील चंद्र-तारे आणि पा म्हणजे स्वामी.. म्हणून चंद्र तार्यांचा स्वामी.. चंद्राला धारण करणारे चंद्रमौलेश्वर म्हणजेच भगवान शंकर यांच्यावरून उडुपा.. किंवा उडुपी हे नाव त्या भागाला मग मिळाले.. किती रोचक आहे ना कथा.. म्हणून याला चंद्रआणि तार्यांची भूमी देखील म्हणतात..किती सखोल ज्ञान होते तिच्याकडे..काही क्षण माझी मलाच लाज वाटली.. तर असे हे आंबा,अननस सासव तिकडे घरघरातून ओरपतात Bhagyashree Lele -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#md#ट्रेडींग रेसिपी#मदर्स डे चॅलेंजआईच्या हाताच्या सर्व रेसिपी आवडतात. ती खुप सुगरण आहे. पण त्यातील आवडती रेसिपी पंचामृत. आ आत्मा अन् इ ईश्वर आई तुझ्यात दिसे परमेश्वर माय भवानी, वात्सल्य मुर्ती अन्नपूर्णा तू माझी स्फूर्ती युगांमागुनी युगे ही सरती अखंड जाज्वल्य तुझी ग महती सदैव वंदिते तव पद पंकज जन्मोजन्मी व्हावी तव आत्मज. Sumedha Joshi -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#md आज जागतिक मातृदिन 💐 कूकपॅड वरच्या माज्या सर्व माता ,भगिनी, मैत्रिणी यांना जागतिक मातृदिन च्या हार्दिक शुभेच्छा💐.आई म्हणजे आ-आत्मा व ई- ईश्वर अशी जिची महती तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच ,या सुष्टीची निर्माती ती पृथ्वी माता . आई म्हणजे पहिलं प्रेम,पहिला गुरू, पहिला उच्चारलेला शब्द ,पहिली मैत्रीण,ती म्हणजे सर्व आयुष्य,अश्या या माझ्या आईच्या स्मृतीस वंदन करून तिच्याकडुन शिकलेल्या व माज्या आवडीच्या पाककृती शेयर करते. तसं तर माझी आई सुगरण होती त्यामुळे तिच्या हातचं सगळंच मला आवडायचं पण आज या दिनाचे निमित्ताने मी आज तिच्या हातचा एक गोड पदार्थ शेयर करत आहे ते म्हणजे मँगो लस्सी ,ती लस्सी मिक्सरमध्ये न करता हाताने व्हीस्क चा वापर करून छान फेटून करायची तर बघू मग तिच्या हातची सोप्या पद्धतीने केलेली मँगो लस्सी.. Pooja Katake Vyas -
नाशिक फेमस पाव वडा (pavvada recipe in marathi)
#md #Mothers_Day_Recipes. #पाव_वडामाझ्या आयुष्यातील स्त्री शक्ती🌹🙏 माझ्या आयुष्यावर सर्वात मोठा प्रभाव ज्या स्त्री शक्तीचा आहे ती म्हणजे माझी जन्मदात्री..माझी आई 🙏🙏..ती माझी केवळ आईच नाही तर माझा आधारस्तंभ..माझ्या जीवनाचा दीपस्तंभच आहे..नवदुर्गाच ती माझी..अ पासून ज्ञ पर्यंत मला साक्षर करणारी ,मला मास्टर्स डिग्री घेण्यासाठी उद्युक्त करणारी माझी सरस्वती..स्वतः उत्तम सुगरण आहे आणि तूच सर्व मला शिकवून पाककलेचे धडे देणारी माझी अन्नपूर्णा..नोकरी करुन संसाराला हातभार लावणारी माझी महालक्ष्मी...अत्यंत शिस्तप्रिय,प्रसंगी कठोर होऊन कान उपटणारी माझी महाकाली...जिच्या नावातच *माया*दडली आहे अशी सगळ्या कुटुंबावर अपरंपार माया करणारी,सगळ्यांना गवसून घेणारी,प्रचंड माणसांची आवड असणारी माझी महागौरी...मला जे रास्त आहे ते वेळोवेळी पुरवणारी माझी सिद्धिदात्री...संस्कृती, देवधर्म,संस्कार श्रद्धा,सबुरी,संयम माझ्यात रुजवणारी माझी ब्रह्मचारिणी...माझ्या आजारपणांतून मला बाहेर काढून ,योग्य ते औषधोपचार करुन मला परत ठणठणीत करणारी ,आरोग्यदायी सुखाचे दिवस दाखवणारी माझी कुष्मांडा...अशी कितीतरी रुपे मी तुझ्यात पाहते आई..या नारायणीचे गुणगान करावे तेवढे थोडेच...जिने माझे अवघं जीवनच व्यापून टाकलंय अशा या स्त्री शक्ती साठी काही शब्दमोती वेचण्याचा आणि कवितेतून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न..🙏🌹🙏 माझ्या आईची बटाटा ही अत्यंत प्रिय भाजी.. तर mother's Day च्या निमित्ताने तिच्यासाठी खास नाशिक फेमस पाव वडाची virtual treat मी तिला दिलीये..कोरोनामुळे घरीच थांबायला लागतंय..पण हरकत नाही..चला तर पण या खमंग चमचमीत रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#fdr #दिप्तीची ही रेसिपी, आजच्या तिच्या वाढदिवशी, तिलाच समर्पित करते आहे. #Deepti Padiyar Varsha Ingole Bele -
बेरीची चीक्की (berichi chikki recipe in marathi)
#बेरीचिचीक्कीतूप केल्यानंतर उरलेली बेरी संपवायची कशी बय्राच वेळी साखर बेरी किंवा केक मध्ये वापरून संपवली जाते . तर आज अशीच बेरीची कुरकुरीत रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया कशी झालीय ही रेसेपि बघूया. Jyoti Chandratre -
अळुवडया (alu vade recipe in marathi recipe in marathi)
#ashr#अळुवडी आवडत नाही असा माणूस विरळाच. नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटले ना.पावसाळ्यात अळूच्या पानांना वेगळीच छान चव असते .या दिवसात केलेली अळुवडी अप्रतिम लागते.अळुमधे औषधी गुणधर्म खुप आहेत. अळुमधे ए,बी,सी जीवनसत्वे,कॅल्शियम,पोटॅशियम असते अॅन्टीऑक्सिडंट चे प्रमाण जास्त असल्याने प्रकृतीसाठी फायदेशीर आहे.शिवाय पित्त कफनाशक आहे.बाळंतिणीला जर दुध येत नसेल तर भाजी खायला देतात.असा हा बहुगुणी अळु त्याची जर अळुवडी केली तर आणखीन बहार.चला तर कशी करायची बघुयात. Hema Wane -
रोज टी (गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा) (rose tea recipe in marathi)
#nrr नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास करतात त्यात चहा ची आठवण येते म्हणून आज मी तुम्हाला आवडेल असे मस्त चहा बनवला आहे 🌹☕😋😋👍🙏 Rajashree Yele -
नारळाच्या दुधातली अळूवडी (naralachya doodhatli aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #पारंपरिक पदार्थउकडून🥖, फोडणी🌀🍥 देऊन किंवा शॅलो फ्राय करून आपण नेहमी अळूवडी🍀🌀 करतो, पण ही आहे नारळाच्या दुधात🥥🥛 शिजवलेली अळूवडी🥘🍥🌀. माझ्या चुलत सासूबाई म्हणजे नवरोबांची मोठी काकी (आम्ही त्यांना नवसईच्या आई म्हणतो... नवसई गावाचे नाव आहे बरं, उगीच सस्पेन्स मध्ये नका जाऊ😜😜) खूप छान करायच्या.. आता वयानुसार नाही जमत त्यांना, पण अजूनही गावी गणपती मध्ये नैवेद्याच्या ताटात हा पदार्थ कम्पल्सरी... आणि त्यांच्या हातच्या नारळाच्या दुधात केलेल्या आळुवड्या म्हणजे सगळ्यांसाठी पर्वणी असायची.आता आम्ही सगळ्या सूना मिळून करतो पण ह्या लुगडं/पातळ नेसणाऱ्या म्हाताऱ्या बायकांच्या👵🏼🧕🏼 हाताला कसली चव होती, अगदी मोजक्या वेळेत आणि मोजके जिन्नस वापरून केलेले पदार्थ सुद्धा इतके रुचकर😋😋 कसे व्हायचे हे एक न उलगडलेले कोडे आहे. माझी आजी सुद्धा अशीच सुगरण. घरात असलेल्या भाज्या🍆🍅🥔🥬🍤🌶️🧄 आणि काही मसाले एका भांड्यात🍜🍲 कालवून ते भांडे चुलीवर🔥 ठेवायची. आणि घरा मागच्या वाडीत काहीतरी काम करायला🌱🌿🎋 निघून जायची, परत आल्यावर भाजी तयार🥘 आणि ती पण अतिशय चविष्ट. 😋😋😋मूळ मुद्दा राहिला बाजूला🤦🏻♀️तर बघुया नारळाच्या दुधात केलेली अळूवडी.😋🌀👌🏻 नेहमीसारखेअळूच्या पानाचे रोल करून न शिजवता कापायचे. कुकर मध्ये थोडे जास्त तेल घालून जिरे हिंग मोहरी कढीपत्ता याची फोडणी देऊन त्यात रचायचे मग वरून नारळाचे दूध घालून ४-५ शिट्ट्या घ्यायच्या. ही अळुवडि दुसऱ्या दिवशी शिली जास्तच चांगली लागते... Minal Kudu -
अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_भाजी_cooksnap_challenge#अळूची_भाजीश्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवाई पसरुन निसर्गाचे सुंदर रुप आपल्याला बघायला मिळते. या महिन्यात खूप सणवार साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाची पूजा करुन आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी चिरणे, कातणे तसेच फोडणी न देणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. ज्यांना जमेल तशी प्रथा पाळून नागपंचमी साजरी करतात. यादिवशी आमच्या कडे नागोबाला दुध लाह्या प्रसाद म्हणून दाखवतात. त्याच बरोबर अळूची भाजी आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. पारंपारिक पध्दतीने बनवलेली अळूची भाजी यालाच अळूचे फदफदे असेही म्हणतात. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अळूचं गरगटं (alucha gargata recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विक-बिना कांदा- लसुण रेसिपी #पोस्ट 2 आज मी अळूचं गरगटं केल.आमच्या कडे श्रावणात उपवास सोडते वेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. नुसती खायला पण ही भाजी छान लागते. तिखट, गोड,आंबट या तिन्ही चवींचा सुरेख संगम या भाजीमधे छान जुळून येतो.🥰🥰🥰 Shubhangee Kumbhar -
खतखतं (khatkhat recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #DeepaliDakeMunshiदिपाली ताई,मी कुकस्नॅप केलेली खतखतं या रेसिपीशी बहुतांशी साधर्म्य असलेली भाजी आमच्या परिसरात गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ऋशीपंचमीच्या दिवशी केली जाते. या दिवशी बैलाच्या कष्टाचे पदार्थ न वापरता जेवण बनविले जाते. त्यामुळे ही भाजी बनविण्यासाठी नैसर्गिक रित्या उगविणारे घटक वापरले जातात. मी ही रेसिपी बनविताना त्या पारंपारिक पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Ashwini Vaibhav Raut
More Recipes
टिप्पण्या