मसूर डाळ खिचडी (masoor dal khichdi recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#pcr
प्रेशर कुकर रेसिपीज
कुकर हा सर्व गृहिणी साठी एक वरदानच आहे.कुकर मध्ये आपण केक पासून भाजी,पुलाव आमटी सर्व काही करू शकतो.कमी वेळात,गॅसची बचत होते.
चला तर मग अशीच लवकर होणारी रेसिपी बघूया

मसूर डाळ खिचडी (masoor dal khichdi recipe in marathi)

#pcr
प्रेशर कुकर रेसिपीज
कुकर हा सर्व गृहिणी साठी एक वरदानच आहे.कुकर मध्ये आपण केक पासून भाजी,पुलाव आमटी सर्व काही करू शकतो.कमी वेळात,गॅसची बचत होते.
चला तर मग अशीच लवकर होणारी रेसिपी बघूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
3 जणांसाठी
  1. 1/2 कपतांदूळ
  2. 4 टेबलस्पूनमसूर डाळ भिजवलेले
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टीस्पूनजीरेे
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टेबलस्पूनलसूण
  9. 1सुकी लाल मिरची
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. 1 टीस्पूनगोडा मसाला
  13. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे. मसूर भिजवून घ्यावेत.

  2. 2

    कुकरमध्ये तेल तापवून त्यात मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर कांदा टाकून परतून घ्यावा.

  3. 3

    टोमॅटो टाकून परतून घेणे. नंतर त्या मध्ये हळद,लाल तिखट,गोडा मसाला टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    आता त्या मध्ये मसूर टाकून एकजीव करावे. नंतर त्या मध्ये तांदूळ टाकून परतून घ्यावे.

  5. 5

    अंदाजे पाणी टाकून दोन शिट्टी काढून घ्या.

  6. 6

    कुकर गार झाल्यावर खिचडीला वरुन फोडणी करावी.तेल तापवून त्यात मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता, लसूण,लाल मिरची फोडणी करावी.ही फोडणी खिचडी वर घालावी.

  7. 7

    गरमागरम मसूर खिचडी खायला द्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या (3)

Similar Recipes