बटाटा कांदे पोहे (batata kande pohe recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#जागतिक_पोहे_दिन
: या दिवसाबद्दल तुम्हाला माहीती असेल च....!
सकाळच्या नाश्ताच्या अस्सल पारंपरिक पदार्थ म्हणजे पोहे. आजही प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये सकाळी चहासोबत पोहेच नाश्तासाठी दिले जातात. केवळ सकाळचा नाश्ताच कशाला अगदी लग्न ठरवतांनाही प्रथम चहा-पोह्यांचा कार्यक्रम केला जातो. त्यामुळे पोह्यांची महती अशी काही शब्दांत सांगता यायची नाही. सुरुवातीच्या काळात साध्या असणाऱ्या पोह्यांमध्ये अनेक बदल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आज कांदापोहे, बटाटा पोहे, तर्री पोहे असे अनेक पोह्याचे प्रकार पाहायला मिळतात. विशेष म्हणजे वर्ल्ड फेमस असलेल्या या पोह्यांचा आज हक्काचा दिवस. हक्काचा दिवस म्हणजे आज जागतिक पोहे दिवस (World Poha Day) आहे. खरंतर पोह्यांचाही खास जागतिक दिन असतो हे फार कमी जणांना माहित आहे. म्हणूनच या दिवसाविषयी आपण जाणून घेऊयात. (know-about-history-of-poha-diwas-on-World-Poha-Day) पहिला जागतिक पोहे दिन ७ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाचा प्रणेता कोण हे नेमकं स्पष्ट नसलं तरीदेखील मॅगीच्या जगात आजही पोह्यांवर प्रेम करणारे असंख्य जण असल्याचं पाहायला मिळतं. मॅगीच्या गुणवत्तेवरुन सुरु झालेल्या वादामध्येच ट्विटरवर गमतीने कुणी तरी पोहे दिनाची संकल्पना मांडली आणि तिच पुढे रुजू झाली असं म्हटलं जातं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीजाड पोहे
  2. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  3. 1 छोटाबटाटा
  4. 2मिरच्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1कांदा
  7. ५- ६ कडीपत्ता ची पाने
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. तेल फोडणी करीता
  12. टोमॅटो आवडीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम कांदा,टोमॅटो, मिरची आणि बटाटा बारीक चिरून घ्या, सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे, नंतर पोहे छान ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मोकळे करून बाजूला ठेवा, नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे टाकून छान तडतडून घ्यावे

  2. 2

    नंतर शेंगदाणे टाकून १/२ मिनिटे तेलात होवू द्या नंतर कडीपत्ता ची पाने टाकून दिले,बारीक चिरलेला मिरची, कांदा, बटाटा टाकून छान शिजवून घ्यावे नंतर हळद पावडर घालून परतून घ्यावे

  3. 3

    नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे आणि सोबतच थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे नंतर पोहे टाकून

  4. 4

    छान सर्व पोह्यांना पिवळेपणा लागत पर्यंत मिक्स करून घ्यावे आणि ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर होवू द्यावे अश्या प्रकारे आजच बटाटा कांदे पोहे तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes