गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

घरातील उपलब्ध साहित्यातून तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गुळ पापडी.

गुळ पापडी (gul papadi recipe in marathi)

घरातील उपलब्ध साहित्यातून तयार होणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे गुळ पापडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०-४५ मिनिटे
५-६
  1. २५० ग्रॅम गव्हाचे पीठ
  2. २०० ग्रॅम साजूक तूप
  3. २०० ग्रॅम गुळ
  4. 1/2 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  5. 1/4 कपकिसलेल सुक खोबर

कुकिंग सूचना

४०-४५ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले. गुळ चिरून घेतला. खोबरे किसून घेतले.आवडत असल्यास खसखस,तीळ घालू शकता. मी घातलेले नाही.

  2. 2

    मंद आचेवर गव्हाचे पीठ तुपावर खमंग परतून घेतले.

  3. 3

    गॅस बंद करून त्यात चिरलेला गुळ,वेलची जायफळ पूड घालून नीट मिक्स केले.

  4. 4

    एका ताटाला तूप लावून ग्रीस केले.त्यावर तयार मिश्रण थापून घेतले.त्यावर खोबऱ्याचा कीस पसरवला.

  5. 5

    थोडे कोमट असतानाच वड्यांचा आकार पाडला.एखाद्या तासानंतर वड्या कापून घेतल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes