खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)

खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काळी पाने असलेला वडीचा अळू घेऊन त्याचे मागचे देठ काढून घेणे. ती स्वच्छ धून कोरडी करून घेणे. पानांची मागची बाजू लाटनेने थोडी लाटून घेणे. त्याने ती पाने सपाट होतील.
- 2
आता एका खोलगट भांड्यात बेसन पीठ आणि तांदूळ पीठ घालून घेणे. आता त्या मध्ये चवीनुसार तिखट, मीठ, हळद, ओवा, तीळ सगळे घालून एकत्र करून घेणे. आता त्या मध्ये आवडीनुसार थोडासा चिंचेचा कोळ व गुळ घालून एकत्र करणे. याने छान आंबट गोड चव येते.आता यात थोडे थोडे पाणी घालून बॅटर बनवून घेणे. बॅटर खूप पातळ ही नको आणि खूप घट्ट ही नको असे भिजवावे.
- 3
आता अळूचे एक पान घेऊन त्याची मागची बाजू एका प्लेट मध्ये वर घेणे आता त्या बाजू वर बेसन बॅटर हाताने थोडे थोडे घेऊन लागेल तसे बॅटर सगळीकडे बोटाने पसरून घेणे. आता त्या वर दुसरे पान पुन्हा उलटे ठेवून त्यालाही बेसन बॅटर सगळीकडे पसरून घेणे. असे 4-5 पाने एकावर एक ठेवून सगळ्या पानांना बेसन बॅटर लावून घेणे. आता एका वरच्या बाजूने अलगद या पानांनाचा पीठ लावत रोल करून घेणे.t
- 4
सगळे पानांना बॅटर लावून त्याचा रोल करून घेणे. आतागॅस वर कढई ठेवून त्यात पाणी घालावे व त्यात एक स्टॅन्ड ठेवून त्या वर एक प्लेट ठेवून त्यात हे रोल ठेवून देणे. झाकण ठेवून 15 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घेणे. वेळ झाली कि गॅस बंद करावा. थंड झाले कि ते रोल गोल कापून घेणे.
- 5
आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तळण्यासाठी तेल घालावे. तेल गरम झाले कि कापून घेतलेले वडी मध्यम आचेवर दोनीही बाजूने सोनेरी रंगावर तळून घेणे. मस्त खमंग खुसखुशीत अळू वडी तयार झाली. गरम गरम सर्व्ह करावी.
- 6
खमंग खुसखुशीत अळू वडी खाण्यासाठी तयार आहे.
Top Search in
Similar Recipes
-
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#shr#week-3श्रावणात अळू ची पान भरपूर प्रमाणात येतात आम्ही श्रावणात अळू चे भाजी बनविण्यापासून सर्वच प्रकार बनवतो त्यातलाच हा एक प्रकार आहे अळू वडी चा थोडा वेगळा प्रयत्न केलाय तुम्ही पण बनवुन बघा नक्की आवडणार तुम्हाला चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
-
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
डाळ मिश्रीत अळू वडी (dal mix alu wadi recipe in marathi)
#ngnr#नो ओनियन,नो गार्लिक रेसिपी "डाळ मिश्रीत अळू वडी"नेहमी आपण बेसन पीठ, तांदूळ पीठ वापरून अळू वडी, कोथिंबीर वडी बनवतो..पण कधी डाळ भिजवून, वाटून मसाले घालून बनवुन बघा.तुम्हाला नक्कीच आवडेल.. खुप छान कुरकुरीत आणि टेस्टी होते वडी..एकदा ही रेसिपी बनवताना माझ्या आईने सांगितलेला किस्सा आठवला.. पुर्वी गावी घरीच जात्यावर दळण दळायचे,घरचे धान्य,डाळी असायचे....आजी दिवसभर कुठेतरी शेजारच्या गावी जाणार होती,तिने आईला सांगितले डाळ दळून घे मग अळू वडी कर...आईला वाटले जात्यावर दळण म्हणजे जास्त डाळ दळावी लागेल मग तिने अळूवडी साठी लागेल तेवढीच डाळ दोन तास भिजत ठेवली व दगडी पाट्यावर वाटून घेतली.व अळूवडी बनवली..आजी, आजोबांना ती अळूवडी खुप आवडली.तेव्हापासून आमच्या घरात डाळ वाटून च अळूवडी बनू लागली.. नंतर मिक्सर आला मग पाट्यावर वाटायचे श्रम ही बंद झाले... मला आठवण झाली की अधुनमधून डाळ वाटून करते अळूवडी.. लता धानापुने -
खमंग खुसखुशीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#shr #cooksnap_challenge श्रावण महिना हा वेगवेगळ्या सणांचा महिना.. ऊन-पावसाचा महिना.. या दिवसात चहुकडे हिरव्यागार पानाफुलांनी बहरलेला निसर्ग पहायला मिळतो..त्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून मन आणि डोळे तृप्त होतात..म्हणूनच दूर्वा,तुळस,आघाडा,बेल, वेगवेगळ्या पत्री , सोनटक्का,पिवळा चाफा,मोगरा,चमेली,शेवंती,गुलाब ही फुले ..ही निसर्गाने आपल्यावर केलेली उधळण आपण देवाला वाहून निसर्गाचे देणे निसर्गाला अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतो ..😊🙏 पावसाळ्यात पिकणाऱ्या हिरव्यागार भाज्यांची तर लयलूट असते.दोडका,पडवळ,घोसाळी,लाल भोपळा,भेंडी,काकडी,भाजीचे अळू,वडीचे अळू ..या भाज्यांचे नैवेद्य मग आपसूकच होतात..तर अशा या सणांच्या दिवसात बाहेरचे आल्हाददायक वातावरण तसेच घरामधील मंगलमय वातावरण यामुळे मन प्रसन्न प्रफुल्लित होत असते आणि म्हणूनच हे सणवार आपण उत्साहाने साजरे करतो..असाच एक घरोघरी साजरा केला जाणारा सण म्हणजे श्रावणी शुक्रवारची श्री जिवती देवीची पूजा..🙏🌹🙏..आपल्या मुलाबाळांना आयुरारोग्य,सुख समाधान,यश प्राप्त व्हावे म्हणून महिला जिवतीची पूजा करतात..आघाड्याची माळ, विविध फुले वाहतात..पुरणावरणाचा,चणेगुळ,दुधाचा नैवेद्य दाखवतात,सवाष्णीला जेवायला बोलावून तिचे मनोभावे पूजन करुन खणा नारळाचे ओटी भरुन आपल्या मुलाबाळांसाठी उदंड आयुष्य मागतात..संध्याकाळी पुरणाची दिवे करून जिवतीला ,तिच्या बाळांना,आपल्या मुलाबाळांना औक्षण करतात..जिवतीची कहाणी वाचतात.श्री जिवतीला दाखवण्यात येणार्या नैवेद्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे अळूवडी..ही नैवेद्याच्या पानात हवीच..तर मी आज@ArtiTareयांचीरेसिपीcooksnapकेलीआहे.Thank you आरती.. खूप मस्तखमंग झाली अळूवडी😊🌹❤️ खूप आवडली मला..🌹 Bhagyashree Lele -
-
अळु वडी (alu wadi recipe in marathi)
#ashr क्रीस्पी अळु वडी . खमंग व चविष्ट आंबट गोड अशी सर्वांची आवडणारी अळुवडी माझ्या मुलाची अतिशय आवडणारी अळुवडी . Shobha Deshmukh -
कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)
मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋 Preeti V. Salvi -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ashrआषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली. कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
अळूची खुसखुशीत वडी (Aluchi Vadi Recipe In Marathi)
#BRRअळूची वडी अतिशय खमंग व खुसखुशीत खायला खूप छान लागते Charusheela Prabhu -
कुरकुरीत अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#gur गणेशोत्सव स्पेशल म्हणून बापाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवण्यासाठी अळूवडी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
सात्विक अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#सात्विकरेसिपीज#कुकस्नॅपचॅलेंजया चॅलेंज करिता,supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली .फारच सुंदर आणि चविष्ट झाली अळू वडी..😋😋Thank you dear for this delicious recipe ...😊🌹 Deepti Padiyar -
-
मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजजेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी. Sumedha Joshi -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
अळूवडी रेसिपी (aloo vadi recipe in marathi)
#KS1श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात.चला पाहूयात अळूवडीची रेसिपी, nilam jadhav -
शाही अळू (shahi aloo recipe in marathi)
#अळूआमच्या बागेत खुप अळू उगवलेत . मला वाटलं नेहमी एकाच चवीची भाजी करण्या पेक्षा काहीतरी वेगळा प्रयोग करून पाहुया. मग शाही अळू बनवले. मस्त झालेय. जरा हटके. तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल तुम्हाला. चला पाहुया शाही अळू कसे करायचे. Shama Mangale -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #आळूवडीश्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. आळूवडी करता मोठी पान घ्यावीत. Anjali Muley Panse -
पालक वडी (palak vadi recipe in marathi)
#GA4 #Week8#Palak vadi स्टिम या क्लूनुसार मी पालक वडी बनविली आहे. पालक असल्यामुळे ही वडी पौष्टिक तर आहे आणि चवीला छान आहे आणि खुसखुशीत पण होतात. Archana Gajbhiye -
-
अळूवडी प्रकार - 2 (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#मका पीठ#तांदूळ पीठ Sampada Shrungarpure -
अळूवडी.. (aloowadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्त्विक रेसिपीज सात्त्विक रेसिपीज या बिना कांदा लसणाच्या असतात..मागच्या सात्त्विक रेसिपी मध्ये आपण श्रावण महिन्यात सणासुदीला सात्त्विक रेसिपी का खातो ते बघितलंय. श्रावणात क्षणात येते सरसर शिरवे...श्रावणसरी बरसत असतात..आणि या दिवसात खूप सार्या रानभाज्या उगवतात..त्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात..त्याचप्रमाणे भाजीचं अळू,वडीचं अळू देखील फोफावलेलं असतं..म्हणूनच का याला *वेडं अळू *म्हणतात.🤔..असो..अळूचे गुणधर्म मी आता इथे काही सांगत बसत नाही..तुम्ही तेवढे गुगलून घ्या..म्हणजे गुगल करा हो..😄.... तर या अळूवडीला,अळूभाजीला नैवेद्याच्या पानात अग्रभागी स्थान असतेच असते..या दोन्ही शिवाय नैवेद्य पुरा होत नाही..फक्त याची एक खोड म्हणजे..अळू खाजरा असतो काही वेळेस..म्हणून मग चिंचेचा कोळ घातला की अळूमधले crystals त्यात विरघळतात..आणि मग घसा खवखवत नाही..आणि मग प्राप्त होते स्वर्गीय चवीची खमंग खरपूस चवदार रुचकर अशी अळूवडी..आहा...तर मग चला चला लवकर..या माझ्या पाठोपाठ या cookpad च्या virtual किचनमध्ये😄😄 Bhagyashree Lele -
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
-
आळूवडी (Aluvadi Recipe In Marathi)
पावसाळ्यात अळूची पानं अतिशय सुंदर मिळतात त्याची वडी खूप खुसखुशीत होते Charusheela Prabhu -
नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)
# KS3# नागपुरची सांबार वडीझटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी.... Gital Haria -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ngnrश्रावण महिन्यात घरोघरी आवर्जून केली जाणारी ,खमंग आणि कुरकुरीत अळूवडी.यामधे मी लसूण वापरता अळू वडी बनवली आहे. तरीही चवीत मात्र काही फरक नाही. Deepti Padiyar -
आषाढ स्पेशल तिखट मीठाच्या पुर्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
#ashr# आषाढ स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh
More Recipes
टिप्पण्या (2)