खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ashr

आषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.
ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋
आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली.
कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!
ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊
पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.
अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.
चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
६ ते ७ जणांसाठी
  1. 4-5 अळूची पाने(मोठी असतील तर २ ते ३)
  2. 4 कपबेसन
  3. 1/2 कपतांदळाचे पीठ
  4. 1/2 कपआलं लसूण मिरची, कोथिंबीर,कडिपत्ता पेस्ट
  5. 1 टीस्पूनलाल तिखट आवडीनुसार
  6. 1 टीस्पूनहळद
  7. मीठ चवीनुसार
  8. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  9. 1/2 टेबलस्पूनपांढरे तीळ
  10. चिमूटभर ओवा
  11. चिंचगूळाचंं पाणी
  12. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पानं स्वच्छ धुऊन घ्या.व पुसून घ्या. माझ्याकडे मोठी पानं होती म्हणून मी ३ चं घेतली आहे ‌.

  2. 2

    मिक्सरमधे आलं लसूण मिरची कडिपत्ता, कोथिंबीर यांची पेस्ट करून घ्या.
    बाऊलमधे तांदळाचं पीठ व वरील सर्व मसाले,चिंचगूळाचं पाणी, तीळ,ओवा घालून अंदाजे पाणी घालून छान मिक्स करून घ्या.

  3. 3

    अळूच्या पानांची मागच्या शिरा काढून लाटण्याने लाटुन घ्या.म्हणजे वडी कापताना शिरा मधे मधे येणार नाही.व वडी सुटणार नाही.

  4. 4

    बेसनाचे मिश्रण पानांना व्यवस्थित लावून घ्या. पाने उलट सुलट बाजूंनी ठेऊन घ्या.बेसनाचे मिश्रण पानांना व्यवस्थित लावून घ्या. म्हणजे वड्या एकसारख्या पडतील. त्याचा रोल तयार करून
    २० मि.वाफवून घ्या.

  5. 5

    रोल थंड करून घ्या.व त्याच्या वड्या कापून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

  6. 6

    गरमागरम कुरकुरीत अळू वडी खाण्यासाठी तयार...😊😋😋
    वरून आवडत असल्यास ओले खोबरे कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (9)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Hi दिप्ति तुझी खमंग कुरकुरीत अळूवडी ची रेसिपी मी बनवली ( कुकस्नॅप) केली खुप छान मस्त कुरकुरीत झाली 👌
( मी वड्या शॉलो फ्राय केल्या)
धन्यवाद दिप्ति🙏

Similar Recipes